कोगनोळी : अचानक उच्च दाबाने विद्युत पुरवठा झाल्यामुळे विद्युत उपकरणे जळाल्याची घटना घडली असून यामध्ये नागरिकांना हजारो रुपयांचा फटका बसला आहे. ही घटना शुक्रवारी रात्री ७ वाजण्याच्या सुमारास घडली.
शुक्रवारचा आठवडी बाजार होता. ७ वाजण्याच्या दरम्यान उच्च दाबाने विद्युत पुरवठा झाला. त्यामुळे दुप्पट प्रकाश पडला. अचानक काही घरातील, दुकानातील बल्ब फटाकेसारखे आवाज होऊन जळाले. काही नागरिकांच्या टी.व्ही, फ्रिज, संगणक आदी विद्युत उपकरणे जळाली आहेत. तसेच एका ठिकाणी नवीन दुचाकीचा चार्जर सुद्धा जळाला आहे. या घटनेमुळे नागरिकांना हजारो रुपयांचा फटका बसला आहे.