निपाणी (वार्ता) : शहरात पाणी टंचाईच्या पार्श्वभुमीवर कोडणी-गायकवाडी येथील खणीतील पाणी उपसा करून तलावामध्ये सोडण्याची मागणी होत आहे. याशिवाय शहरात असणाऱ्या दत्त खुले नाट्यगृहाजवळील तलावातील पाणी वापरात आणावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते पंकज गाडीवड्डर यांनी केली आहे.
पंकज गाडीवड्डर म्हणाले, इ.स. गेल्या चाळीस वर्षापासून येथील वड्डर समाज गायकवाडी येथील खाणींचे खोदकाम करून आपली उपजिवीका चालवित होता. मात्र, कालांतराने सरकारी अधिकाऱ्यांनी त्यांचे काम त्या बंद पाडले. तेंव्हापासून त्या खणी पाण्याने भरल्या आहेत. सदर पाणी हे मृत स्वरूपाचे आहे. त्याचा वापर पिण्याकरीता होणार नाही.
या पार्श्वभुमिवर निपाणी येथील खुले दत्त नाट्यगृह येथील पाणी जिवंत झऱ्याचे पाणी आहे.असे असतांना नगरसेवक आणि अधिकारी पाण्याच्या शोधात गायकवाडी खणीकडे लक्ष केंद्रित करीत आहेत.
शहरातील चोवीस तास पाईप लाईन पाणी पुरवठा योजना अपयशी ठरली आहे. त्यामुळे दत्त खुले नाट्यगृहाजवळील झरे असलेली ठिकाणे उपलब्ध आहेत. तेथे फिल्टर हाऊस बसवून पाण्याचा प्रश्न सोडविण्यात यावा अशी मागणीही गाडीवड्डर यांनी केली आहे.