निपाणी (वार्ता) : पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर येथील प्रतिभानगर कोपऱ्यावर चालकाचा ताबा सुटल्याने झालेल्या अपघातात लोखंडी पाईप वाहतूक कंटेनर पलटी झाला. यामध्ये चालक सोनूराम (रा. गुजरात) याला किरकोळ दुखापत झाली. या घटनेची घटनेची निपाणी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाले आहे.
आपण आता बाबत अधिक माहिती अशी, गुजरातहून म्हैसूरकडे लोखंडी पाईप घेऊन कंटेनर जात होता. कंटेनर प्रतिभानगर कोपऱ्यावर आल्यानंतर पुढे जाणाऱ्या वाहन चालकाने अचानकपणे ब्रेक मारल्याने मागे असलेला कंटेनर चालक सोनूराम याचा वाहनावरील ताबा सुटला. परिणामी कंटेनर रस्त्याच्या शेजारी पलटी झाला. शहर पोलिसांनी भेट देऊन पंचनामा केला आहे.