प्राचार्या स्नेहा घाटगे : जागतिक पर्यावरण दिन
निपाणी (वार्ता) : भारतीय संस्कृती समृद्ध असून ती वेगवेगळ्या सणांनी नटलेली आहे. प्रत्येक सणामागील हेतू हा पर्यावरण पूरक आहे. त्या सणाचे महत्त्व समजून घेऊन प्रत्येकाने पर्यावरणाचे संरक्षण करावे, असे आवाहन प्राचार्या स्नेहा घाटगे यांनी केले. बेळगाव मराठा मंडळ संचलित येथील मॉडर्न स्कूलमध्ये आयोजित पर्यावरण दिन कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून त्या बोलत होत्या. प्रमुख पाहुण्या म्हणून पर्यावरण आणि पक्षीप्रेमी फिजा चाऊस उपस्थित होत्या.
समर्थ पाटील यांनी स्वागत केले. फिजा चाऊस यांनी, सध्याच्या काळात मानवी जीवन समृद्ध होण्यासाठी दैनंदिन जीवनातील कृती मधून पर्यावरणाचे संरक्षण करणे आवश्यक असल्याचे सांगितले. स्वरा जाधव, सिमरा जमादार, आर्या खोत, संस्कृती खराडे यांनी मनोगतातून पर्यावरण संवर्धन करण्याचे आवाहन केले. रुद्र बुवा यांनी सूत्रसंचालन तर स्मिथिल रावण यांनी आभार मानले. यावेळी पी. यु. वागळे, स्मिता पवार, प्रिया डिग्रज, रश्मी सिदनाळे यांच्यासह शिक्षक विद्यार्थी उपस्थित होते.
उर्दू शाळेत वृक्षारोपण
येथील उर्दू शाळा क्र.२ मध्ये पर्यावरण दिन साजरा करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. त्यानंतर पर्यावरण जागृतीसाठी प्रभात फेरी काढली. मुख्याध्यापक एम. बी. जैनापूरे यांनी विद्यार्थ्यांनी घराच्या परिसरात वृक्षारोपण करण्याचे आवाहन केले.
पर्यावरण दिनाच्या निमित्ताने निबंध व चित्रकला स्पर्धा पार पडल्या. यावेळी शिक्षक, पालक उपस्थित होते.