निपाणी (वार्ता) : येथील जत्राट वेस-लखनापूर मार्गावरील पुलाचे पावसामुळे नुकसान नुकसान झाले आहे. ओढ्याची एक बाजू कात्रून गेली आहे. त्यामुळे चार चाकी वाहण्यासाठी रस्ता बंद झाला असून केवळ दुचाकी वाहने ये-जा करत आहेत. परिणामी वालीकर, केसरकर आणि पाटील मळ्यातील नागरिकासह लखनापूर परिसरातील वाहनधारकांची गैरसोय होत आहे.
लखनपूरसह शेतीवाडीतील वस्तीवर जाण्यासाठी हा एकमेव ओढ्यावरील पूल आहे. सहा वर्षापासून दरवर्षीच्या पावसाळ्यात हा पूल पाण्यात वाहून जातो. यंदा या पुलाचे बांधकाम करण्यात येत होते. पण अर्धवट कामामुळे या पावसात पुलाचे मोठे नुकसान झाले आहे. याशिवाय वालीकर मळा परिसरातील ट्रान्सफार्मर ओढ्यात पडला आहे. तर एक ट्रान्सफार्मर खराब झाला आहे. त्यामुळे विद्युत पुरवठा खंडित झाला आहे. बराच वेळा वरील परिसरातील नागरिकांनी नगरसेविका अनिता पठाडे यांच्या पुढाकाराने लोकवर्गणी काढून पुलाची दुरुस्ती केली होती. पण पुन्हा यंदाच्या पावसाळ्यात अपूर्ण कामामुळे या पुलाचे नुकसान झाले आहे. तरी संबंधितांनी कायमस्वरूपी पुलाचे दुरुस्ती करण्याची मागणी होत आहे.