विद्यार्थ्यांनी केल्या विविध वेशभूषा : शहरातून पालखी मिरवणूक
निपाणी (वार्ता) : येथील छत्रपती शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित नूतन मराठी विद्यालयामध्ये आषाढी एकादशीच्या कार्यक्रम पार पडला. यावेळी विद्यार्थ्यांनी दिंडी सोहळ्याचे नियोजन केले होते. शिवाय माऊली अश्वाचा रिंगण सोहळा पार पडला.
संस्थेचे संचालक विक्रमादित्य धुमाळ यांच्या हस्ते पालखीचे पूजन करून या दिंडीची सुरुवात करण्यात आली. मुख्याध्यापक एस. एस. पचंडी, मुख्याध्यापक व्ही. एम. बाचणे यांनी आषाढी दिंडीचे माहिती सांगितली.
दिंडी घट्टे गल्ली, दत्त मंदिर, सटवाई रोड, तानाजी चौक, जुना मोटर स्टँड, बेळगाव नाका, आडके प्लॉट ते जामदार प्लॉट दिंडी काढण्यात आली.
दिंडी मार्गावर ठिकठिकाणी महिलांनी पाणी घालून दिंडीचे स्वागत केले. शहरातील विविध मंडळांनी मुलांना खाऊ देऊन दिंडीचे स्वागत केले. यावेळी विद्यार्थ्यांनी विठ्ठल रुक्मिणी, संत ज्ञानेश्वर,संत तुकाराम, संत एकनाथ, संत गोरा कुंभार, संत जनाबाई, संत सोपान अशा विविध संतांचे पोशाख केले होते. या शिवाय विद्यार्थ्यांनी मर्दानी खेळ, दानपट्टा, लाठी काठी व लेझीमचे कार्यक्रम सादर केले.शाळेच्या मैदानावर रिंगण सोहळा करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
यावेळी वेंकटेश्वरा पदवी पूर्व कॉलेजचे उपप्राचार्य एम. डी. खोत, यु. आर. पवार, एस. बी. पवार, आर. एस. चव्हाण, व्ही. बी. पाटील, एस. आय. किवंडा, एस. आर. संकपाळ, एस. पी. जगदाळे, व्ही. एम. पाटील, एस. एस. कुलकर्णी, यु. वाय. आवटे, ए. एस. कुंभार, एस. के. जोशी, आर. एस.माने प्रदीप पाटील उपस्थित होते.