Wednesday , March 4 2026
Breaking News

निपाणीत ३० रोजी दहीहंडीचा थरार; गोविंदा पथकाला दीड लाखाचे बक्षीस

Spread the love

 

दौलतराव पाटील सोशल फाउंडेशन व पैलवान अजित नाईक युवा शक्तीतर्फे आयोजन

निपाणी (वार्ता) : येथील दिवंगत दौलतराव पाटील सोशल फाऊंडेशन, हेल्थ क्लब व पैलवान अजित नाईक युवाशक्ती संघटनेच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी (ता.३०) दुपारी ४ वाजता म्युनिसिपल हायस्कूलच्या मैदानावर दीड लाख रुपयांच्या दहीहंडीचा थरार आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती संयोजक निपाणी टाऊन प्लॅनिंग अध्यक्ष निकु पाटील व पैलवान अजित नाईक यांनी दिली.
विजेत्या संघाला १ लाख ५१ हजार रुपयांचे बक्षीस दिले जाणार आहे.स्पर्धेत सहभागी होऊन कमीत कमी पाच थर लावणाऱ्या प्रत्येक संघाला पाच हजार रुपयांचे रोख बक्षीस दिले जाणार आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार प्रियांका जारकीहोळी या उपस्थित राहणार आहेत. कोल्हापूर दक्षिणचे आमदार ऋतुराज पाटील यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन तर युवा नेते राहुल जारकीहोळी यांच्या हस्ते बक्षीस वितरण होणार आहे.
यावेळी माजी मंत्री विरकुमार पाटील, माजी आमदार काकासाहेब पाटील, सुभाष जोशी, सहकाररत्न उत्तम पाटील, चिकोडी जिल्हा काँग्रेस व बुडा अध्यक्ष लक्ष्मण चिंगळे, उपाध्यक्ष रोहन साळवे, निपाणी ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष राजेश कदम, माजी जिल्हा पंचायत सदस्य राजेंद्र वडर, पंकज पाटील, अण्णासाहेब हावले, सुमित्रा उगळेसुजय पाटील यांच्यासह आजी-माजीनगरसेवक व मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
या स्पर्धेसाठी १५ संघाना निमंत्रित करण्यात येणार असून या स्पर्धेसाठी ११ जणांची पंच कमिटी स्थापन करण्यात आली आहे. गणेश आडेकर, सागर पाटील, अस्लम आत्तार, नवनाथ चव्हाण, राकेश पाटील, शुभम कदम, प्रतीक शहा यांचे सहकार्य मिळाले आहे. या काळात महावीर आरोग्य सेवा संघातर्फे आरोग्यसेवा पुरवली जाणार आहे. नाव नोंदणीसाठी गोविंदा पथकानी निकु पाटील व पैलवान अजित नाईक यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

About Belgaum Varta

Check Also

विद्यार्थ्यांनी प्रयोगशीलता अंगीकारून नवी दिशा द्यावी; गटशिक्षणाधिकारी महादेवी नाईक

Spread the love  पडलिहाळमध्ये विज्ञान उपक्रम स्पर्धा निपाणी (वार्ता) : विज्ञान म्हणजे केवळ माहिती नव्हे, …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *