Thursday , April 23 2026
Breaking News

राजमाता जिजाऊ सांस्कृतिक प्रतिष्ठानतर्फे वधू -वर मेळावा संपन्न

Spread the love

 

बेळगाव : सुप्रसिद्ध डॉक्टर व भाजप नेत्या डॉ. सोनाली सरनोबत यांच्या नेतृत्वाखाली राजमाता जिजाऊ सांस्कृतिक प्रतिष्ठानतर्फे आयोजित वधू -वर मेळावा आज रविवारी सकाळी रामनाथ मंगल कार्यालय येथे यशस्वीरित्या पार पडला.

सदर वधू -वर मेळाव्याप्रसंगी आशीर्वाद देण्यासाठी गोसाई मठ गावीपूर बंगलोर येथील मराठा समाजाचे स्वामीजी श्री जगतगुरु वेदांताचार्य मंजुनाथ स्वामीजी आणि कद्रोळीमठ बैलहोंगल येथील श्री गुरुपुत्रय्या स्वामीजी उपस्थित होते. दोन्ही स्वामीजींनी राजमाता जिजाऊ साहेबांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करून मेळाव्याचे उद्घाटन केले.
यावेळी डॉ. सोनाली सरनोबत यांनी दोन्ही मान्यवरांचा शाल व फळे देऊन सत्कार केला.
मेळाव्याला संबोधित करताना डॉ. सरनोबत यांनी मराठा समाजाने स्वतःच्या हितासाठी एकत्र येऊन समाजाला बळकट बनवण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले.
त्यांच्या राजमाता जिजाऊ सांस्कृतिक प्रतिष्ठानतर्फे लवकरच मराठा समाजासाठी सामुहिक विवाह कार्यक्रम हाती घेण्यात येणार आहे. जिजाऊ ब्रिगेड समाजातील सर्व महिलांच्या पाठीशी प्रत्येक अडचणीत उभी राहील, अशी ग्वाही देऊन कौटुंबिक हिंसाचार आणि इतर अनेक पीडितांना जिजाऊ ब्रिगेड आधार देत आहे, अशी माहिती डॉ. सोनाली सरनोबत यांनी दिली.

वेदांताचार्य मंजुनाथ स्वामीजींनी डॉ. सरनोबत यांना सर्व सामाजिक प्रयत्नांसाठी प्रोत्साहन दिले आणि त्यांच्या टीमला मोठ्या यशासाठी आशीर्वाद दिले. तसेच स्वामीजींनी हिंदू धर्म आणि हिंदू सनातन धर्माच्या संवर्धन आणि संरक्षणात मराठा समाजाचे योगदान याबद्दल उपदेश केला. आजच्या वधू -वर मेळाव्यामध्ये 300 भावी वर-वधू सहभागी झाले होते. दीपाली मलकारी यांनी सूत्रसंचालन केले. गीतांजली चौगुले, नम्रता हुंदरे, कांचन चौगुले, आशाराणी निंबाळकर, वृषाली मोरे, लक्ष्मी गौंडाडकर, विद्या सरनोबत व चंद्रा चोपडे यांनी मेळाव्याचे संचालन केले. या उपक्रमाला कर्नाटक क्षत्रिय मराठा परिषदेचे सदस्य दिलीप पवार, सतीश बाचीकर, रोहन कदम, डी. बी. पाटील, संजय भोसले यांनी पाठिंबा दर्शविला.

About Belgaum Varta

Check Also

स्वतःला वकील असल्याचे सांगणाऱ्या एका व्यक्तीची सामाजिक कार्यकर्त्यांची मदत

Spread the love  बेळगाव : बेळगाव न्यायालय परिसरात स्वतःला वकील असल्याचे सांगणाऱ्या एका व्यक्तीची गंभीर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *