निपाणी (वार्ता) : येथील मध्यवर्ती छत्रपती शिवाजी महाराज चौकात माजी आमदार काकासाहेब पाटील यांच्या हस्ते श्री. मराठा सौहार्द सहकारी संघाचे उद्घाटन झाले.
काकासाहेब पाटील यांनी, मराठा समाजाने एकत्रित येऊन या संस्थेची स्थापना केली आहे. त्याच्या माध्यमातून सर्वसामान्यांना पत मिळवून देऊन त्यांचे जीवनमान उंचवावे, असे आवाहन केले. सहकार्यारत्न उत्तम पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले.
यावेळी माजी आमदार प्रा. सुभाष जोशी, नगराध्यक्षा सोनल कोठडीया, उपनगराध्यक्ष संतोष सांगावकर, नगरसेवक विलास गाडीवडर, डॉ. जसराज गिरे, विजय शेटके, विश्वास पाटील, प्रवीण भाटले, पप्पू चव्हाण, जयवंत भाटले, चंद्रकांत जासूद, किरण कोकरे, नवनाथ चव्हाण, दीपक वळवडे, संस्थेचे अध्यक्ष प्रशांत नाईक, उपाध्यक्ष ज्ञानेश्वर ढेरे, संचालक बाबासाहेब तिप्पे, रत्नदीप पानारी, आकाश पाटील, अतुल चावरेकर, संदीप खाडे, कैलास मोरे, अनुजा नाईक यांच्यासह संचालक, आजी माजी नगरसेवक व मान्यवर उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta