अदृश्य काडसिद्धेश्वर महाराज; समाधी मठात आराधना महोत्सव
निपाणी (वार्ता) : श्रावण हा देव, धर्म, व्रतवैकल्य करण्याचा महिना आहे. या काळात महिनाभर प्रवचन कीर्तन असे विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. त्यामधून अध्यात्म शांती व मन परिवर्तन होत असते. त्यासाठी प्रत्येकाने या महिन्यात जपनाम, अन्नदान, धार्मिक सेवा केली पाहिजे. या महिन्यातील सत्संगामुळे जीवन सार्थकी लागते, असे मत कणेरी मठातील अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामींनी व्यक्त केले. येथील वृक्ष लिंग समाधी मठात बुधवारी (ता. ४) आयोजित २१३ व्या आराधना महोत्सवात ते बोलत होते.
सिद्धेश्वर स्वामी म्हणाले, विरूपाक्षलिंग स्वामींनी, समाधी मठात आश्रम शाळा सुरू केली. ज्ञानदानासह योगासनाचे महत्व पटवून दिले आहे. मठातर्फे सेंद्रिय शेती सह गोपालन केले जात आहे. त्यामुळे दानशूर व्यक्तींनी मठाला देणगी देऊन सहकार्य करण्याचे आवाहन केले.
यावेळी प्राणलिंग स्वामी, डॉ. वीरेंद्र कोठीवाले यांनीही समाधी मठाच्या कार्याचा आढावा घेतला. महोत्सवानिमित्त सकाळी ६ वाजता जपयज्ञ,९ वाजता पालखी उत्सव आणि दुपारी १२ वाजता महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमास सदलगा येथील श्रद्धानंद स्वामी, सिद्धारूढ मठाचे स्वामी, डॉ. चंद्रकांत कुरबेट्टी, सुरेश शेट्टी, चंद्रकांत कोठीवाले, रवींद्र शेट्टी, वज्रकांत सदलगे, दयानंद शिप्पुरे, गजेंद्र तारळे, प्रकाश बाडकर, प्रशांत रामणकट्टी, सुनील जनवाडे, इराण्णा शिरगावे, चिंटू वाळवे, अनिल नेष्टी, डॉ. एस. आर. पाटील त्यांच्यासह निपाणी व परिसरातील भावीक उपस्थित होते.