Sunday , September 20 2026
Breaking News

माजी नगराध्यक्ष डी. व्ही. पाटील स्मृती चषक क्रिकेट स्पर्धेच्या पाचव्या पर्वाचे उद्घाटन

Spread the love

 

निपाणी (वार्ता) : निपाणी येथील दिवंगत माजी नगराध्यक्ष डी.व्ही. पाटील यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ हिंदवी स्पोर्ट्स क्लबतर्फे आयोजित पाचव्या पर्वातील ‘डी. व्ही. पाटील स्मृती चषक’ फुल पीच क्रिकेट स्पर्धेचे रविवारी (ता. २४) उद्घाटन झाले. २८ मे पर्यंत या स्पर्धा होणार आहेत.
अर्जुननगर येथील एम. डी. विद्यालय, देवचंद कॉलेजच्या मैदानावर सुरू झालेल्या या स्पर्धेचे उद्घाटन आणि छत्रपती शिवाजी महाराज, डी. व्ही. पाटील, हिमांशू पाटील, नितीन शिंदे यांच्या प्रतिमेचे पूजन माजी मंत्री वीरकुमार पाटील, बुडा अध्यक्ष लक्ष्मण चिंगळे, निपाणी ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष राजेश कदम व मान्यवरांच्या हस्ते झाले.
स्पर्धेतील विजेत्या संघांनाअनुक्रमे ५१०००, २५०००, ७५०० तर मॅन ऑफ द सिरीजसाठी सायकल, बेस्ट बॅट्समन व बेस्ट बॉलरसाठी विशेष ट्रॉफी देण्यात येणार आहेत. ही सर्व बक्षिसे व चषक दिवंगत हिमांशू उर्फ शशांक संयोजित (निकु) पाटील यांचे स्मरणार्थ टाऊन प्लॅनिंग अध्यक्ष निकु पाटील यांचेकडून देण्यात येणार आहेत.
उद्घाटनानंतर पहिला सामना खडके वाडा येथील योगेश स्पोर्ट्स क्लब आणि अमिदवाडा येथील विराज स्पोर्ट्स क्लब यांच्यात झाला. त्यामध्ये हमिदवाडा संघाने १३ धावा जमविल्या. तर खडकेवाडा संघाने १८ धावा काढून विजेतेपद पटकाविले.
यावेळी टाऊन प्लॅनिंग अध्यक्ष संयोजित पाटील, रोहन कोठीवाले, किरण कोकरे, किरण पाटोळे, प्रतीक शहा,रवींद्र श्रीखंडे, अरुण आवळेकर, सचिन पोवार, सागर पाटील, सुभाष शिंदे, नितीन उपाळे, स्वप्निल पावले, रणजीत मगदूम, चंद्रकांत पोवार, विनोद बल्लारी, कृष्णा कुंभार, निलेश येरुडकर, सचिन काटकर, सुरेश घाटगे, रमेश भोईटे, पुंडलिक कुंभार यांच्यासह क्रिकेट प्रेमी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

प्रत्येक क्षेत्रातील अभियंत्यांचे योगदान महत्त्वाचे

Spread the love  जयश्री पाटील ; निपाणीत अभियंता दिन कार्यक्रम निपाणी (वार्ता) : अभियंता म्हणजे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *