Sunday , September 20 2026
Breaking News

निपाणी लेटेक्स कॉलनीतील विश्वकर्मा उद्यानास बेलेवाडी ग्रामपंचायत अधिकाऱ्यांची भेट

Spread the love

 

निपाणी (वार्ता) : निपाणी येथील लेटेक्स कॉलनी परिसरात पर्यावरणप्रेमी शिक्षक व सामाजिक कार्यकर्ते नामदेव चौगुले यांनी निर्माण केलेल्या श्री विश्वकर्मा उद्यानाला बेलेवाडी (काळम्मा) ग्रामपंचायत अधिकाऱ्यांनी भेट देऊन उद्यानाची पाहणी केली. पर्यावरण संवर्धनासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती घेत उपस्थितांनी चौगुले यांच्या कार्याचे कौतुक केले.
नामदेव चौगुले यांनी वाढदिवस, लग्नाचा वाढदिवस, मित्रांच्या वाढदिवसांच्या निमित्ताने वृक्षारोपण करण्याची अभिनव परंपरा जपली आहे. स्वखर्चातून विविध वृक्षांची लागवड करून त्यांनी उभारलेले श्री.विश्वकर्मा उद्यान आज पर्यावरण संवर्धनाचा प्रेरणादायी आदर्श ठरत आहे. वृक्षसंवर्धन, जैवविविधता आणि पर्यावरण संरक्षण याविषयीचे त्यांचे ज्ञान व प्रत्यक्ष कृतीतून व्यक्त होणारी निसर्गनिष्ठ भूमिका सर्वांसाठी प्रेरणादायी असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.
यावेळी उपसरपंच बजरंग कांबळे, ग्रामपंचायत सदस्य अनिल पाटील, ग्रामपंचायत सदस्य अजित पाटील, मुख्याध्यापक आर. के. पाटील, आनंदराव पाटील प्रशाला बेलेवाडी (काळम्मा), तसेच सर पिराजीराव प्राथमिक शिक्षक पतपेढीचे माजी अध्यक्ष टी. एस. गडकरी उपस्थित होते.
उद्यानातील विविध औषधी, फुलझाडे व पर्यावरणपूरक संकल्पनांची माहिती नामदेव चौगुले यांनी पाहुण्यांना दिली. ग्रामीण भागात अशा प्रकारचे उपक्रम अधिक प्रमाणात राबविण्याची गरज असून पर्यावरण रक्षणासाठी प्रत्येकाने वृक्षलागवड व संवर्धनाची जबाबदारी स्वीकारली पाहिजे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

About Belgaum Varta

Check Also

प्रत्येक क्षेत्रातील अभियंत्यांचे योगदान महत्त्वाचे

Spread the love  जयश्री पाटील ; निपाणीत अभियंता दिन कार्यक्रम निपाणी (वार्ता) : अभियंता म्हणजे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *