Sunday , September 20 2026
Breaking News

निपाणी मराठा सौहार्द सहकारी संस्थेला १६.६९ लाखाचा निव्वळ नफा

Spread the love

 

निपाणी (वार्ता) : निपाणी येथील मध्यवर्ती शिवाजी चौकातील श्री मराठा सौहार्द सहकारी संस्थेची बैठक पार पडली. त्यामध्ये ‌अल्पावधीतच संस्थेने भरीव आर्थिक प्रगती केली आहे. आर्थिक वर्षे २०२५-२६ अखेरीस संस्थेला १६ लाख ६९ हजाराचा निव्वळ नफा झाल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष प्रशांत नाईक यांनी दिली.
नाईक म्हणाले, संस्थेचे १ हजार २४ सभासद असून ११ लाख ५० हजार रुपयांचे भागभांडवल आहे. ७ कोटी १ लाख ६८ हजार रुपये इतक्या ठेवी असून ४ कोटी ७७ हजार आहेत. एनपीए शून्य टक्के असून संस्थेने १६ लाख ६९ हजार इतका नफा मिळविला आहे. २ कोटी ७८ लाख ५७ हजार गुंतवणूक केली आहे.
येत्या आर्थिक वर्षात शाखा विस्तार करण्याचा तसेच सामाजिक बांधिलकी जपण्याच्या दृष्टीने विविध उपक्रम हाती घेण्याचा संकल्प संचालक मंडळाने केल्याचे नाईक यांनी सांगितले.
बैठकीस संस्थेचे संस्थापक उपाध्यक्ष ज्ञानेश्वर ढेरे, बाबासाहेब तिप्पे,कैलास मोरे, रत्नदीप पानारी, आकाश पाटील, संदीप खाडे, अतुल चावरेकर, अनुजा नाईक, गौरी पाटील, सचिन दुर्गे यांच्यासह संचालक, सभासद व कर्मचारी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

प्रत्येक क्षेत्रातील अभियंत्यांचे योगदान महत्त्वाचे

Spread the love  जयश्री पाटील ; निपाणीत अभियंता दिन कार्यक्रम निपाणी (वार्ता) : अभियंता म्हणजे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *