Sunday , September 20 2026
Breaking News

शिवानंद निलण्णावर प्रकरण : जादा नफा मिळवलेल्या गुंतवणूकदारांच्या अडचणीत वाढ

Spread the love

 

बेळगाव : ४,५०० कोटी रुपयांच्या कथित आर्थिक घोटाळ्याप्रकरणी सीआयडीचा तपास अधिक तीव्र करण्यात आला असून, या प्रकरणात जादा आर्थिक फायदा मिळवलेल्या गुंतवणूकदारांच्याही अडचणी वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

शिवानंद निलण्णावर यांच्या मालकीच्या शिवम असोसिएट्स कंपनीत सुमारे ३५ हजार गुंतवणूकदारांनी पैसे गुंतवले होते. तपासादरम्यान अनेकांना त्यांच्या मूळ गुंतवणुकीपेक्षा दुप्पट परतावा मिळाल्याचे प्राथमिक चौकशीत समोर आले आहे.
सीआयडीकडून सध्या व्यवहारांची सखोल पडताळणी सुरू असून, ज्यांना अतिरिक्त आर्थिक लाभ झाला आहे अशा गुंतवणूकदारांची माहिती गोळा करण्यात येत आहे. काही गुंतवणूकदारांनी ५० लाख रुपयांची गुंतवणूक करून तब्बल १ कोटी रुपयांपर्यंत परतावा मिळवल्याची माहिती तपासात पुढे आली आहे.
सीआयडी डीआयजी भीमाशंकर गुळेद यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करणारे पथक अतिरिक्त लाभाची रक्कम परत मिळविण्याच्या दृष्टीने कारवाईची तयारी करत आहे. या माध्यमातून फसवणूक झालेल्या इतर गुंतवणूकदारांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न असल्याचे सांगण्यात येत आहे.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *