Monday , September 21 2026
Breaking News

मुडलगीत तरुणाची चाकूने भोसकून हत्या; प्रेमप्रकरणातून खून झाल्याचा संशय

Spread the love

 

बेळगाव : बेळगाव जिल्ह्यातील मुडलगी शहरातील वड्डर गल्ली परिसरात एका तरुणाची चाकूने भोसकून निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. लक्ष्मण बंडीवड्डर (वय २२) असे मृत तरुणाचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, लक्ष्मण हा विजयपूर जिल्ह्यातील टक्कळकी गावात कामानिमित्त गेला होता. तो १८ मे रोजी आपल्या मूळ गावी परतला होता. दरम्यान, शनिवारी मध्यरात्री अज्ञात तरुणांनी त्याच्यावर चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या लक्ष्मणचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

घटने मागे प्रेमप्रकरण कारणीभूत असल्याची परिसरात चर्चा सुरू असून, चार तरुणांवर संशय व्यक्त करण्यात येत आहे. पोलिसांनी आरोपींच्या शोधासाठी विशेष पथके स्थापन करून तपासाला गती दिली आहे.

दरम्यान, हल्ल्यानंतर रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या लक्ष्मणने आपल्या नातेवाईकांना फोन करून, “माझ्यावर चाकूने हल्ला झाला आहे,” अशी माहिती दिली होती. त्यानंतर नातेवाईकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत त्याला स्थानिक रुग्णालयात दाखल केले. मात्र, अतिरक्तस्रावामुळे त्याचा मृत्यू झाला.

लक्ष्मण हा क्रांतिकारक भगतसिंग यांचा कट्टर चाहता होता. काही दिवसांपूर्वी त्याने “भगतसिंग युवक संघ” स्थापन करून मित्रपरिवारात वेगळी ओळख निर्माण केली होती. त्याच्या अकाली निधनामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *