Tuesday , September 17 2024
Breaking News

निपाणी : पावसाच्या सरीतच ‘बाप्पां’च्या आगमनाची तयारी

Spread the love

 

बाजारपेठेत सजावट साहित्यासह, फळे खरेदीसाठी गर्दी

निपाणी (वार्ता) : लाडक्या गणपतीबाप्पांच्या आगमनासाठी आता काही तास शिल्लक राहिले आहेत. त्यात पावसाच्या सरी कोसळत असल्याने खरेदीत काही वेळ व्यत्यय आला. परंतु भक्तांचा उत्साह तेवढाच वाढत असून, भरपावसातही खरेदीसाठीभक्त बाजारपेठेत पाहायला मिळत आहेत. शुक्रवारी (ता. ६) हरितालिका पूजन झाल्यानंतर नंतर बाप्पांची स्वारी घरी निघणार असून शनिवारी बाप्पाची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे.
गणेशोत्सवानिमित्त दरवर्षीप्रमाणे गेले आठवडाभर भाविकांची निपाणी बाजारपेठेत विविध साहित्य खरेदीसाठी गर्दी‌ होत आहे. बाप्पासाठी लागणाऱ्या विविध प्रकारची फुले, मोत्यांच्या माळा, विविध फुलांचे हार, दागिने, सजावटीसाठी मखरे, रांगोळी, विद्युत रोषणाईसाठी तोरणे, कापूर, धूप, अगरबत्ती आणि पेढे व सर्व प्रकारच्या मेवामिठाईने मुख्य बाजारपेठ सजली आहे.
——————————————————————
तयारी पूर्णत्वाकडे
यंदा पाऊस थांबून, थांबून पडत आहे. काही भागांत मोठा पाऊस काही ठिकाणी कमी आहे. परंतु पाऊस समाधानकारक असल्याने व मध्येच उघडीप देत असल्याने चित्रशाळांमध्ये मूर्तिकारांची लगबग सुरू होती. रंगकाम पूर्ण करून बाप्पाची मूर्ती वेळेत भाविकांच्या हाती देण्यासाठी शुक्रवारी (ता.६) रात्री उशिरापर्यंत यांची कसरत सुरू होती.
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे मंडप सजावटाची कामे पूर्ण केली आहेत. पोलिसही अनेक ठिकाणी विशेष लक्ष ठेवून आहेत. उत्सवकाळात बंदोबस्त व गस्तीची कामे योग्यप्रकारे व्हावीत, यासाठी पोलिसांचा प्रयत्न आहे.
——————————————————————–
झेरॉक्स सेंटरवर गर्दी
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना प्रशासनाकडून परवानगी घेणे बंधनकारक केले आहे. त्यापासून वर नगरपालिकेत परवानगी दिली जात आहे. त्यापासून वर विहित नमुन्यातील अर्ज भरून देण्यासाठी झेरॉक्स केंद्रावर झेरॉक्स मारण्यासाठी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची गर्दी होत असल्याचे इंद्रजीत बगाडे यांनी सांगितले.

About Belgaum Varta

Check Also

बेळगावातील मारुती नगरमध्ये सिलिंडर स्फोट; सुदैवाने मोठा अनर्थ टळला

Spread the love  बेळगाव : बेळगाव येथील मारुती नगर येथील महावीर कॉलनीमध्ये अचानक सिलिंडरचा स्फोट …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *