निपाणी (वार्ता) : कर्नाटक व महाराष्ट्र सीमा भागातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या बोरगाव येथील ग्रामदैवत हजरत पीर बाबा ढंगवली व हजरत पीर हैदरशा मदरशा यांच्या उरुसाचा मंगळवारी (ता.१९) मुख्य दिवस होता. त्यानिमित्त गलेफ घालण्यासह नैवेद्य व दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती.
हजरत पीर बावाढंगवली व हजरत पीर हैदरशा मदरशा यांच्या उरूसाला रविवार पासून (ता. १७) प्रारंभ झाला आहे. मंगळवारी (ता. १९) उरुसाचा मुख्य दिवस होता.
सोमवारी (ता. १८) गंधरात्र कुराणखणी झाली. त्या दिवशी त्यांचे शिष्य हैदरशा मदरशा यांनाही बाबांबरोबर प्रचार केल्याने यांनाही उरुस व गलेफाचा मान दिला. रविवारी (ता. १७) फराशी, सोमवारी (ता. १८) रोजी गंधरात्र, कुराणखणी आणि दंडवत घालण्यात आला. मंगळवारी (ता. १९) भर उरुस झाला. याच दिवशी गलिफ, नैवेद्य असे कार्यक्रम झाले. यावेळी पाटील परिवारातर्फे सहकाररत्न उत्तम पाटील, युवा उद्योजक अभिनंदन पाटील यांनी गलेफ अर्पण केला. यावेळी मीनाक्षी पाटील, धनश्री पाटील, विनयश्री पाटील, पृथ्वीराज पाटील, वैष्णवी पाटील यांच्यासह नगरसेवक उपस्थित होते.
गंध लावण्याचा मान बाबासाहेब पाटील- पोलीस पाटील या घराण्याला तर सरकार गलिफचा मान राजू मगदूम घराण्याला देण्यात आला. सोमवारी (ता. १८) व मंगळवारी (ता. १९) रात्री कव्वालीची जुगलबंदी झाली.
बुधवारी (ता. २०) सकाळी दहा वाजता उत्तम पाटील युवाशक्तीतर्फे जनरल बैलगाडी, एक बैल – एक घोडा, घोडागाडी शर्यतीचे आयोजन करण्यात आले आहे. रात्री झंकार कॉमेडी होणार आहे. या सर्व कार्यक्रमासाठी उद्घाटक म्हणून सहकाररत्न उत्तम पाटील व उद्योजक अभिनंदन पाटील यांच्यासह नगरसेवक उपस्थित राहणार आहेत.