मंत्री हसन मुश्रीफ; कागल शाखेचे उद्घाटन
निपाणी (वार्ता) : सहकार रत्न रावसाहेब पाटील (दादा )यांनी बोरगाव सारख्या सीमाभागात अरिहंतचे रोपटे लावले होते. त्याचे आता वटवृक्षात रूपांतर होत आहे. सहकाराबरोबरच सामाजिक बांधिलकी जपत शैक्षणिक, धार्मिक क्षेत्रातील त्यांचे काम उल्लेखनीय आहे. आता संस्थेची येथे शाखा सुरू झाल्याने कागल औद्योगिक विभागाला आणखी चालना मिळेल. सध्या १२०० कोटीच्या ठेवी संस्थेकडून कागल शाखेतच २ हजार कोटींचा टप्पा पूर्ण होईल, असे मत महाराष्ट्राचे मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केले. बोरगाव अरिहंतच्या कागल शाखेचे उद्घाटन करून ते बोलत होते.
प्रारंभी सहकारत्न उत्तम पाटील यांनी स्वागत केले. त्यानंतर मंत्री हसन मुश्रीफ व मान्यवरांच्या हस्ते शाखेचे उद्घाटन झाले. शाखा शुभारंभ प्रसंगी पूजा घालण्यात आली होती.
अभिनंदन पाटील यांनी, १२०२ कोटी ठेवी संस्थेकडे आहेत. शेतकरी, सभासद, अल्पभूधारक, व्यापारी वर्गाना ९९७ कोटींची कर्ज वितरण, २१६ कोटी गुंतवणूक करून ६० शाखाद्वारे बँकेचे कामकाज सुरू आहे. संस्थेने विविध कर्ज योजना व ठेव योजनांचा लाभ सर्वसामान्य सभासदांना देऊन त्यांच्या आर्थिक जीवनमान उंचविण्याचा प्रयत्न केला आहे. सभासदांच्या मागणीनुसार महाराष्ट्रातही शाखांचा विस्तार केला जात असल्याचे सांगितले.
यावेळी नावेद मुश्रीफ, सुभाष शेट्टी, निरंजन पाटील-सरकार, वर्धमान पाटील, गजानन कावडकर, सुदेश बागडी, प्रकाश गायकवाड, रघुनाथ चौगुले, सुरेश घाटगे, अमित अथणे, ॲड.गजानन खोत, अमित पिष्टे, दिलीप पठाडे, अशोक घोळवी, संदीप संकपाळ, मुख्य शाखेचे सीईओ अशोक बंकापुरे, माजी नगराध्यक्ष, बाबासाहेब नाईक, प्रकाश गाडेकर, प्रकाश नाळे, प्रवीण काळबर, भैय्या माने, सुनील माळी, नवल बोते, चंद्रकांत गवळी यांच्यासह विविध शाखांचे संचालक व कर्मचारी उपस्थित होते.