अरुण निकाडे; कुर्ली हायस्कूलमध्ये क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन
निपाणी (वार्ता) : क्रिडा स्पर्धांमध्ये भाग घेतल्याने विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धात्मक वातावरण निर्माण होते. कठोर परिश्रम, चिकाटी व सातत्यपूर्ण सरावाच्या सहाय्याने स्पर्धेत यश संपादन करता येते. शिवाय विद्यार्थ्यांमध्ये सौहार्द वाढून आदराची भावना निर्माण होते.त्यामुळे नेतृत्व कौशल्य विकासाला मदत मिळत असल्याचे मत अरुण निकाडे यांनी व्यक्त केले. रयत शिक्षण संस्थेच्या कुर्ली येथील सिद्धेश्वर विद्यालयात आयोजित वार्षिक क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक एस. एस. चौगुले होते.
क्रिडा शिक्षक ए. ए. चौगुले यांनी स्वागत केले. के डी पाटील यांच्या हस्ते ध्वजपूजन झाले. अरुण निकाडे यांच्या हस्ते ज्योत प्रज्वलन करून स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. के. डी. पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.
वैयक्तिक व सांघिक अशा दोन्ही गटात या स्पर्धा घेण्यात आल्या. यावेळी टी. एम. यादव, एस. ए. पाटील, के. ए. नाईक, एम. बी. खिरूगडे, स्मिता पाटील, राजश्री पाटील, एम. एस. वाळके, विजय साळुंखे, सागर कुंभार यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते. एस. एस. साळवी यांनी आभार मानले.