
दलित समाजाच्या विविध संघटनेची मागणी; मोर्चाने तहसीलदारांना निवेदन
निपाणी (वार्ता) : पुणे जिल्ह्यातील राजगुरु नगर येथे २६ डिसेंबर रोजी गोसावी समाजातील ७ व ८ वर्षाच्या सख्या दोन बहिणींचे अपहरण करुन त्यांच्यावर बलात्कार करण्यात आला. त्यानंतर त्यांची अमानुष पध्दतीने हत्या करण्यात आली. सदर घटनाही मानवतेला काळीमा फासणारी आहे. या घटनेतील नराधमाला फाशीची शिक्षा द्यावी, या मागणीसाठी भटक्या विमुक्त जाती व गोसावी डोंगरी गरासीया संघ आणि विविध दलीत संघटना तर्फे मंगळवारी (ता. ३१) मोर्चा काढून तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.
निवेदनातील माहिती अशी, गोसावी समाजातील दोन लहान मुलींच्यावर बलात्कार करुन त्यांची हत्या करण्यात आली. या कृत्यामुळे गोसावीसह दलित समाज दुःखी व भयभित झाला आहे. या घटनेचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करीत आहोत. सदर आरोपी हा परप्रांतीय असून त्याच्यावर कडक कारवाई करावी. आरोपीला तात्काळ अटक करुन फाशीची शिक्षा व्हावी. संबंधित आरोपींना तात्काळ अटक करुन फाशीची शिक्षा द्यावी. याशिवाय पिडीत मुलींच्या कुटुंबाला सरकारने १ कोटी रुपयांची आर्थीक मदत करण्यासह कुटुंबातील एका व्यक्तीला सरकारी नोकरीत सामावून कुटुंबीयांचे पुनर्वसन करावे. अशा मागण्या मोर्चाव्दारे भटक्या विमुक्त जाती गोसावी डोंगरी गरासीया संघातर्फे करण्यात आल्या.
यावेळी बुडा अध्यक्ष लक्ष्मण चिंगळे, प्रा. अशोककुमार असोदे, डॉ. अजित माने, प्रा. सुरेश कांबळे, नगराध्यक्ष सोनल कोठडीया, अमित शिंदे, गणू गोसावी यांच्यासह मानवरांनी मनोगत केले.
अविनाश माने यांनी निवेदनाचे वाचन करून सोनल कोठडीया व महिलांच्या हस्ते तहसीलदार मुजफ्फर बळीगार यांना देण्यात आले. त्यांनी निवेदन स्वीकारून वरिष्ठाकडे पाठवण्याच्या आश्वासन दिले. या निवेदनाच्या प्रती देशाचे गृहमंत्री, कर्नाटक आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, जळगाव जिल्हाधिकाऱ्यांना पाठविण्यात आल्याचे सांगण्यात आले.
यावेळी नगरसेवक विलास गाडीवड्डर, टाऊन प्लॅनिंग अध्यक्ष निकु पाटील, राजेंद्र वडर, राजू गुंदेशा, दत्ता नाईक, शौकत मणेर, दीपक सावंत, सुधाकर माने, नवनाथ चव्हाण, रवींद्र श्रीखंडे, पंकज गाडीवड्डर, दिलीप पठाडे, बबन गोसावी, युवराज गोसावी, जयराम गोसावी, सुरेश गोसावी, तानाजी गोसावी, श्रीपाल गोसावी, धनपाल गोसावी, आकाश मकवाना, दिलीप गोसावी यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी आणि दलित व गोसावी समाजातील नागरिक उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta