पंकज पाटील; शेतकऱ्यांना सबसिडी स्वरूपात औषध पंपाचे वाटप
निपाणी (वार्ता) : शेतकऱ्यांनी बदलत्या काळानुसार शेती पिकवावी व नवनवीन पिक पद्धतीचा अवलंब करावा जेणेकरून उत्पादन वाढण्याबरोबरच कीडरोगमुक्त पिकांचे उत्पादन निघून अपेक्षित उत्पादन मिळेल, असे मत माजी जिल्ह पंचायत उपाध्यक्ष पंकज पाटील यांनी व्यक्त केले. येथील पंकज पाटील युवा मंच व राजमनी ग्रुपतर्फे शेतकऱ्यांसाठी सबसिडी स्वरूपात औषध फवारणी बॅटरी पंप व वाॅटर फिल्टर वाटप कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते.
प्रतीक शहा यांनी स्वागत केले. पाटील म्हणाले, अलीकडच्या काळामध्ये शेती व्यवसायामध्ये नवनवीन तंत्रज्ञान उदयास येत आहे.अनेक शेतकऱ्यांनी त्याचा वापर करून शेतीमध्ये नवनवीन पिकांचे उत्पादन घेतले आहे. त्यामुळे अशा शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती सुधारत आहे. शेतकऱ्यांनी नवनवीन पिकांचे उत्पादन घेताना कृषी अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन घ्यावे. शिवाय कीड रोगमुक्त पिकाचे उत्पादन घेऊन आपली प्रगती साधनाचे आवाहन केले.
निपाणी ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष राजेश कदम, चिकोडी जिल्हा काँग्रेस उपाध्यक्ष रोहन साळवे यांच्या हस्ते फीत कापून शेतकऱ्यांना सबसिडी स्वरूपात किटचे वाटप करण्यात आले. यावेळी शिवम पाटील, प्रज्वल देशमुख, गणेश भोसले यांनी पंप व बॅटरी वापरा विषयी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमास अब्बास फरास, शिरीष शहा, राजू मेहता, सुशांत खराडे, अवधूत गुरव, रोहित यादव, शशीकुमार गोरवाडे, यासीन मणेर, अमृत ढोले, खानु बोरगुंडे, संजय अडसूळ, अनिरुद्ध कुरबेटी यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta