
निपाणी (वार्ता) : येथील महादेव गल्लीतील महादेव मंदिरात शुक्रवारी (ता.२४) मध्यरात्री दोन अज्ञात चोरट्यांनी मंदिरातील तिजोरी फोडली. त्यातील रक्कम पोत्यात भरून घेऊन जात असताना पोलीस कर्मचारी आणि बाळू बाळेकनावर यांनी चोरट्यांना पकडण्याचा प्रयत्न केला. पण ते पळून जाण्यात यशस्वी झाले. चोरीपासून ही रक्कम वाचल्याने महादेव देवस्थान कमिटीतर्फे बाळेकनावर यांचा श्रीमंत दादाराजे देसाई सरकार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
शुक्रवारी मध्यरात्री नदाफ, नेगीनहाळ यांच्याबरोबर होमगार्ड बाळू बाळेकनावर हे गस्तीवर होते. त्याचवेळी दोघा अज्ञात चोरट्यांनी महादेव मंदिरातील तिजोरी फोडून रक्कम पोत्यात भरत होते. ही घटना निदर्शनास येताच त्यांनी मंदिरात जाण्याचा प्रयत्न केला. मात्र चोरट्यांनी रकमेचे पोते तिथेच टाकून पलायन केल्याने मोठा अनर्थ टळला. त्यामुळे बाळेकनावर यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी माजी सभापती पाटील, विजयराजे देसाई, माजी सभापती सुनील पाटील, अमर बागेवाडी, रवींद्र कोठीवाले, संजय मोळवाडे, महेश दिवाण, इरांना शिरगावे, प्रकाश पणदे, रवींद्र चंद्रकुडे, सदानंद चंद्रकुडे, महेश पाटील, बाळकृष्ण वसेदार, शशिकांत जाधव, अरुण भोसले, बाबासाहेब चंद्रकुडे, विजय जाधव यांच्यासह महादेव गल्ली परिसरातील नागरिक उपस्थित होते.

Belgaum Varta Belgaum Varta