
निपाणी (वार्ता) : कर्नाटक राज्य रयत संघटना आणि सांगली येथील कुल्लोळी नेत्र रुग्णालयाच्या संयुक्त विद्यमाने बेनाडी येथे रविवारी (ता.२०) मोफत नेत्र तपासणी शिबिराच्या आयोजन करण्यात आले आहे. येथील बसवेश्वर मंदिरात आयोजित शिबिराचे मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे.
यावेळी डोळ्याचा पडदा, मोतीबिंदू, काचबिंदू, लासरू, तिरळेपणा, बुबुळसह डोळ्याच्या इतर रुग्णांची डॉक्टरांकडून तपासणी होणार आहे. शस्त्रक्रियेसाठी निवड झालेल्या रुग्णांवर मोफत उपचार करून औषधे दिली जाणार आहेत. तरी बेनाडी व परिसरातील नेत्र रुग्णांनी या शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन रयत संघटनेचे राज्य अध्यक्ष राजू पोवार, कलगोंडा कोटगे, सिध्दाप्पा मिरजे, नानासाहेब कुंभार, महेश जनवाडे वासु रानगे, आनंदा मस्ताने, बसगोंडा पाटील यांनी केले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta