निपाणी : महाराष्ट्र एकीकरण युवा समिती निपाणी यांच्या वतीने कुर्ली येथे तालुका महाराष्ट्र एकीकरण समिती निपाणी तालुका अध्यक्ष श्री. अजित पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून कुर्ली येथे सरकारी उच्च प्राथमिक मुला-मुलींची शाळा इयत्ता पहिली मध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.
यावेळी तालुका अध्यक्ष श्री. अजित पाटील यांनी सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, मराठी मातृभाषेतून शिक्षण घेतल्यामुळे पुढे शिवाजी विद्यापीठाने अनेक तांत्रिक अभियांत्रिकी बी सी ए,एम सी ए तसेच स्पर्धा परीक्षामध्ये यश मिळविता येथे यासाठी मराठी भाषेतून सरकारी शाळामधून शिक्षण घ्यावे. यासाठी पालकांनी इतर शाळेमध्ये पाल्याला प्रवेश घेवू नये यासाठी विनंती केली. यावेळी सरकारी शाळा मधून शिक्षण घेतले तर अधिक मोठ मोठे अधिकारी बनतात यासाठी महाराष्ट्र एकीकरण समिती आपल्या बरोबर आहे, अशी ग्वाही दिली. यावेळी निपाणी तालुका युवा समिती उपाध्यक्ष गणेश माळी, कार्याध्यक्ष संतोष निढोरे, तालुका समिती कार्यकारी सदस्य शिवाजी पाटील, दीपक पाटील, अमोल पाटील, किरण मगदूम, सुनील माळी, युवराज पाटील, खजिनदार व प्रवक्ते नेताजी पाटील आदी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta