मेंढी व लोकर उत्पादक संघ पदाधिकाऱ्यांचा निर्णय
निपाणी (वार्ता) : सध्या होऊ घातलेल्या बेळगाव जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निपाणी तालुका लोकर उत्पादक सहकारी संघ व मेंढी संगोपन सहकारी संघाच्या पदाधिकाऱ्यांची येथील शासकीय विश्रामगृहात बैठक झाली. त्यामध्ये सर्व संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी पाठिंब्याचे सर्वाधिकार बुडा अध्यक्ष लक्ष्मण चिंगळे यांच्याकडे सोपविण्याचा
निर्णय एकमुखाने जाहीर केला
अध्यक्ष चिंगळे म्हणाले, जिल्हा बँक निवडणुकीत पालकमंत्री सतीश जारकीहोळी, अरभावीचे आमदार भालचंद्र जारकीहोळी हे दोन्ही नेते मिळून जो निर्णय घेतील त्यांच्या निर्णयाशी आम्ही बांधील राहणार आहोत. याबाबत सर्व संस्थांनी डिलिकेट फॉर्म आपल्याकडे जमा करावेत. त्यानंतर फॉर्म पालकमंत्री जारकीहोळी यांच्याकडे सुपूर्द करण्यात येतील. त्यांचा आदेश हा अंतिम राहणार
असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी कल्लाप्पा डोणे, सत्यापा हजारे, श्रीकांत बन्ने, कल्लाप्पा खिलारे, दत्ता धारवाडे, बाळू कोळेकर, सुरेश कोठे, लक्ष्मण काडापुरे, प्रकाश पुजारी, सुधाकर कब्बुरे, संजू आवडखान, संजू गावडे, पांडू हिरवे, अजित पुजारी, सदाशिव दिवटे, सोमराया गावडे यांच्यासह तालुक्यातील स संघाचे पदाधिकारी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta