

निपाणी (वार्ता) : निपाणी येथील श्रीराम सेना कर्नाटक तर्फे ‘आपली दीपावली, आपला सण’ हा उपक्रम राबवून संस्कृती, देव, देश, धर्म, कर्तव्य म्हणून समाजातील अनाथ आणि सर्वसामान्य कुटुंबिया समवेत यंदाची दिवाळी साजरी केली. शिवाय त्यांना दिवाळीचा फराळ ही भेट देऊन त्यांच्या जीवनात एक दिवस तरी प्रकाश देण्याचा प्रयत्न केला.
शहरा आणि उपनगरात अनेक सर्वसामान्य कुटुंबातील सदस्य रस्त्यावर मागून खाणारे नागरिक, अनाथांची संख्या मोठी आहे. त्यांच्या घरामध्ये महागाईच्या परिस्थितीमध्ये सण साजरा करता येत नाही. ही बाब लक्षात घेऊन श्रीराम सेना कर्नाटकच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्तातर्फे दीपावली निमित्त फराळ वाटप करून दीपावलीच्या शुभेच्छा देण्यात आल्या. याशिवाय येथील बसस्थानक परिसर, धर्मवीर संभाजी राजे चौक, साखरवाडी, बेळगाव नाका, मुरुड रोड उड्डाणपूल भागामध्ये फिरून फराळाचे वाटप करण्यात आले. यावेळी आकाश मल्हाडे, अजित पाराळे, बबन निर्मले, अमोल चेंडके, शेखर पाटील, वैभव भाट, जयदत्त काळे, यश जमादार, वरद पाटील, विभावरी पाटील, प्रतीक गोइलकर, गिरीश अंकुशे, पुनम पाटील, प्रज्ञा पाटील, सरिता पारळे, सोनाली काळे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta