
राजू पोवार ; ऊस दर आंदोलनाला वकील संघटनेचा पाठिंबा
निपाणी (वार्ता) : शेतकरी हा देशाचा अन्नदाता आहे. पण त्यांनी उत्पादन केलेल्या पिकांना योग्य दर दिला जात नाही. त्याचा सर्वच फायदा साखर कारखानदार आणि सरकारला होत आहे. त्यामुळे शेतकरी वर्षानुवर्षी कर्जबाजारी होऊन आत्महत्या कडे वळत आहे. त्यामुळे यंदाच्या हंगामातील उसाला साडेतीन हजार रुपये प्रति टन देण्याच्या मागणीसाठी कर्नाटक राज्य रयत संघटनेसह विविध शेतकरी संघटनांनी ऊसतोड बंद आणि चक्का जाम आंदोलन सुरू केले आहे. त्याला सर्व स्तरातून पाठिंबा मिळत असून यंदा साडेतीन हजार रुपये द्या दिल्याशिवाय संघटना थांबणार नाही. संघटनेची मागणी मान्य न झाल्यास ऊस तोड बंद आंदोलन करून रस्त्यावरची लढाई लढण्यात येणार असल्याचे कर्नाटक राज्य संघटनेचे कार्याध्यक्ष राजू पोवार यांनी सांगितले.
सध्या सुरू असलेल्या ऊसतोड आंदोलनाला निपाणी येथील वकील संघटनेने मंगळवारी पाठिंबा व्यक्त केला. शिवाय त्याबाबतचे निवेदन तहसीलदारांना दिले.
पोवार म्हणाले, कारखाने तोट्यात असताना राजकीय मंडळी इतर कारखाने चालवत आहेत. यंदा सोयाबीनलाही मातीमोल दर दिल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. केवळ स्वतःचा स्वार्थ व आपल्या मुलांसाठी तडजोड केली जात आहे. केवळ शेतकऱ्यांचे नाव घेऊन ऊस उत्पादकांना लुबाडण्याचे काम सुरू असल्याने शेतकऱ्यांचे नाव घेऊन राजकारण करण्याचा कोणालाही अधिकार नाही. खर्चाच्या तुलनेत ऊसाला दर देता येत नसेल तर त्यांनी राजीनामा देऊन आपली कामे करावेत. तरी शेतकऱ्यांनी राजकारण बाजूला ठेवून आपल्या न्याय हक्कासाठी एकत्रित येऊन लढा देणे आवश्यक असल्याचे सांगितले.
येथील न्यायालय इमारतीपासून रयत संघटना आणि वकील संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मोर्चा काढला. धर्मवीर संभाजीराजे चौकात मानवी साखळी करून तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.
वकील संघटनेचे अध्यक्ष एस. एस. वैराट यांनी, आंदोलनाच्या वेळी गुन्हे दाखल होणाऱ्या कार्यकर्ते व शेतकऱ्यांचे गुन्हे सोडवण्यासाठी मोफत काम करण्यासाठी सांगितले.
वकील संघटनेचे अध्यक्ष एस. एस. वैराट व पदाधिकाऱ्यांच्या हस्ते तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. त्यांनी निवेदन स्वीकारून जिल्हाधिकाऱ्याकडे पाठवण्याचे आश्वासन दिले.
यावेळीवकील संघटनेचे अध्यक्ष ॲड. एस. एस. वैराट, उपाध्यक्ष ॲड.एम. ए. सनदी, सेक्रेटरी ॲड. निलेश हत्ती, ॲड.ॲड. जे. ए. भोसले, ॲड. एम. व्ही. कुलकर्णी, ॲड. शिवानंद शिरगुप्पे, ॲड. एस. एस. बन्ने, ॲड. महेश दिवाण, ॲड.ए. एम. डावाळे, ॲड. सुषमा बेंद्रे, सुनील पाटील, सुखदेव मगदुम, कलगोंडा कोटगे, सर्जेराव हेगडे, सिद्धूगोंडा हिरीकुडे, सागर हावले, नितीन कानडे, महेश जनवाडे, सागर पाटील, सचिन कांबळे, आनंदा गायकवाड, बाबासाहेब पाटील, सुभाष खोत, सिद्धगोंडा मिरजे, विशाल मिरजे, बाबू माळी, एकनाथ सादळकर, प्रकाश नुले, बाबासाहेब पाटील दयानंद पाटील, नामदेव साळुंखे यांच्यासह निपाणी व ग्रामीण भागातील संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Belgaum Varta Belgaum Varta