Monday , September 21 2026
Breaking News

‘कॅपिटल वन’च्या एसएसएलसी व्याख्यानमालेचे १६ रोजी प्रारंभ

Spread the love

 

बेळगाव : येथील कॅपिटल वन संस्थेच्यावतीने शैक्षणिक उपक्रमांतर्गत बेळगाव परिसरातील विद्यार्थ्यांना शैक्षणिकदृष्ट्या समृद्ध करण्यासाठी तसेच दहावी परीक्षेच्या तयारीसाठी व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले असून, तज्ज्ञ शिक्षकांकडून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले जाणार आहे. विद्यार्थ्यांच्या शाळेमधून केलेल्या नावनोंदणीप्रमाणे व्याख्यानमालेमध्ये सहभागी होता येणार आहे. आजवरच्या परीक्षेमध्ये अवल गुण संख्येने पास होणारे विद्यार्थी व काठावर पास होणारे विद्यार्थी अशा दोन वर्गामध्ये हे शिबिर भरविले जाणार आहे. व्याख्यानमालेचे हे सातत्याने १६ वे वर्ष असून,
१६ नोव्हेंबर २०२५ ते २१ डिसेंबर २०२५ पर्यंत ज्योती महाविद्यालयात प्रत्येक रविवारी सकाळी ८.१५ ते १२ या वेळेत व्याख्यानमाला होणार आहे. सदर व्याख्यानमालेच्या उद्घाटनाचा कार्यक्रम रविवार दि. १६ नोव्हेंबर रोजी सकाळी ८ वाजता द. म. शि. मंडळाचे पदाधिकारी व संस्थेच्या संचालक मंडळाच्या उपस्थितीत होणार आहे.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *