
निपाणी (वार्ता) : येथील पुणे -बंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील उपनगरातील प्रभाग क्र. २० शिंदे नगर परिसरात असणारा महामार्गानजीक सेवा रस्त्यावर बस थांबा आहे. बरेच चालक व वाहक या ठिकाणी बस थांबवत नाहीत. त्यामुळे येथील विद्यार्थी, नोकरदार आणि प्रवाशांची गैरसोय होत आहे. तरी निपाणी आगार प्रमुखांनी या ठिकाणी बस थांबवण्याच्या मागणीची निवेदन नगरसेवक संतोष माने यांच्या नेतृत्वाखाली आगारप्रमुख सहाय्यक रवी शास्त्री यांना देण्यात आले.
निवेदनातील माहिती अशी, शिंदे नगर परिसरातील अनेक विद्यार्थी शिक्षणासाठी निपाणी येथे ये -जा करतात. याशिवाय नागरिक, वैद्यकीय उपचारासाठी रुग्ण, विविध क्षेत्रातील कामगार, अनेक कारणांसाठी निपाणी निपाणीला नियमितपणे येतात. त्यामुळे निपाणी बसस्थानकावरून येणाऱ्या बस शिंदेनगर स्टॉप येथे थांबत नाहीत तर हालसिध्दनाथ कारखान्यावर थांबतात. येथून परतताना नागरिक, महिला विद्यार्थ्यांना अडचणी येत आहेत. या भागात येणाऱ्या बसेस शिंदेनगर येथे थांबण्याचे आदेश देवून कार्यवाही करावी. असेही नमूद करण्यात आले आहे. रवी शास्त्री यांनी निवेदन स्वीकारून याबाबत योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते दिपक सावंत, परशुराम कांबळे, अनिल पुजारी, अमजद मणेर, सचिन गडकरी, राजू क्षिरसागर, सलीम नदाफ, प्रथमेश आंबेकर, महादेव रेटरेकर, साजिद नाईक, किरण सुतार, श्रीकांत माने, सूरज माने, यशवंत म्हेतर, भिकू सातपुते, सूरज मोसे, लखन माने, अर्जुन क्षिरसागर, मुस्तफा हालसी, राकेश कांबळे यांच्यासह नागरिक उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta