Sunday , July 26 2026
Breaking News

बेनाडी भाग्यलक्ष्मी सौहार्द संस्थेच्या अध्यक्ष, उपाध्यक्षांची बिनविरोध निवड

Spread the love

 

निपाणी (वार्ता) : बेनाडी येथील भाग्यलक्ष्मी सौहार्द क्रेडिट संस्थेची निवडणूक बिनविरोध झाली होती. त्यानंतर बैठक होऊन सर्वानुमते संस्थेच्या अध्यक्षपदी रवींद्र जनावडे तर उपाध्यक्षपदी राजेंद्र क्षीरसागर यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
संचालक मधुकर जाधव यांनी स्वागत केले. नूतन अध्यक्ष रवींद्र जानेवाले यांचा सदाशिव जनवाडे व शंकर जनवाडे यांच्या हस्ते तर उपाध्यक्ष राजेंद्र क्षीरसागर यांचा सत्कार एम. बी. जनवाडे, जोतीराम जानवाडे व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. नूतन पदाधिकाऱ्यांनी निवडीबद्दल कृतज्ञता व्यक्त करून सभासद आणि संस्थेच्या प्रगतीसाठी कार्यरत राहण्याची ग्वाही दिली.
यावेळी राजेंद्र चौगुले, सदानंद माळी, संजय पार्वते, निर्मला जनवाडे, शैलजा मिरजे, सुरेश वराळे, रविराज बेरड, अरुण जावीर यांच्यासह संचालक सभासद उपस्थित होते. व्यवस्थापक विजय वाडकर यांनी आभार मानले.

About Belgaum Varta

Check Also

मानकापूर शाळेच्या छतांची दुरुस्ती न केल्याने विद्यार्थी शिक्षकांची गैरसोय

Spread the love  तहसीलदारांच्या आदेशाला केराची टोपली निपाणी (वार्ता) : अडीच महिन्यापूर्वी बोरगाव, मानकापूर परिसरात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *