Sunday , July 26 2026
Breaking News

गुरुवर्य वि. गो. साठे मराठी प्रबोधिनीतर्फे १५ नोव्हेंबर रोजी रोप्यमहोत्सवी बालसाहित्य संमेलनाचे आयोजन

Spread the love

 

बेळगाव : गुरुवर्य वि. गो. साठे मराठी प्रबोधिनीच्या वतीने दिनांक 15 नोव्हेंबर रोजी कॉम्रेड कृष्णा मेणसे साहित्य नगरी स्कूल ऑफ कल्चर (गोगटे रंगमंदिर) येथे 25 व्या मराठी बालसाहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले असून या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे सादरीकरण होणार आहे. या साहित्य संमेलनाच्या संमेलनाध्यक्ष म्हणून प्रा. मृणाल निरंजन पर्वतकर (मुंबई) व उद्घाटक म्हणून श्री. दीपक चंद्रकांत पर्वतकर (उद्योजक, मुंबई) हे उपस्थित राहणार आहेत. हे संमेलन चार सत्रांमध्ये होणार असून संमेलनाची सुरुवात ग्रंथदिंडीने होणार आहे. ग्रंथदिंडी ठीक साडेनऊ वाजता मराठी विद्यानिकेतन पासून गोगटे रंगमंदिर पर्यंत काढण्यात येणार आहे व त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन होईल.

पहिले सत्र कथाकथनचे होईल यामध्ये कथाकथन स्पर्धेमधून निवड झालेले खालील कथाकार आपल्या कथा सादर करतील 1) अथर्व विठ्ठल गुरव- विद्यामंदिर तडशिनहाळ, 2)आराध्या संतोष शिवणगेकर -मराठी विद्यामंदिर शिवणगे, 3)मनाली सुभाष बराटे – मराठी विद्यानिकेतन बेळगाव, 4)सई यादव-  ताराराणी हायस्कूल खानापूर, 5)समृद्धी सांबरेकर- महिला विद्यालय बेळगाव, 6)श्रध्दा पाटील -सरकारी मराठी शाळा निलजी.

दुसरे सत्र कवी संमेलनाचे होणार असून यामध्ये सीमा भागातील विविध शाळांतील विद्यार्थी आपल्या स्वरचित कविता सादर करतील यामध्ये तिसऱ्या सत्रामध्ये पुण्याचे नाट्यकलाकार मधली सुट्टी हे नाटक सादर करणार आहेत. मुलांच्या पोषण आहारासंबंधी जागरूकता निर्माण करणारे हे बालनाट्य असेल. चौथ्या सत्रामध्ये अध्यक्षिय भाषण व प्रबोधिनी तर्फे घेण्यात आलेल्या मराठी व्याकरण स्पर्धा परीक्षा व द. रा. किल्लेदार सुंदर हस्ताक्षर स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांना मान्यवर पाहुण्यांच्या हस्ते बक्षीस देऊन गौरविण्यात येणार आहे. तरी या बाल साहित्य संमेलनाला सीमा भागातील विद्यार्थ्यांनी व मराठी भाषा प्रेमी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन प्रबोधिनीचे अध्यक्ष श्री. जयंत नार्वेकर व सचिव श्री सुभाष ओऊळकर यांनी केले आहे.

मान्यवर पाहुण्यांचा परिचय

संमेलनाध्यक्षा प्रा. मृणाल पर्वतकर – प्राध्यापिका मृणाल निरंजन पर्वतकर या मुंबई येथे वास्तव्याला असून मुंबई विद्यापीठातून त्यांनी एम.एस.सी ही पदवी व डिप्लोमा इन हायर एज्युकेशन ही व्यावसायिक पदवी घेतली आहे. मुंबईतील रूपरेल महाविद्यालय व मिठीबाई महाविद्यालय या प्रतिष्ठित महाविद्यालयांमध्ये 33 वर्षे जीवशास्त्र या विषयाचे अध्यापन त्यांनी केले आहे. ‘लळा अबोलांचा’ हे त्यांचे पुस्तक प्रसिद्ध आहे. वाचन, प्रवास, कविता लेखन, अभिनय, हस्तकला, चित्रकला, बागकाम हे सर्व छंद त्यांनी जोपासले आहेत. विविध शाळांमध्ये त्यांनी वारली व मधुबनी या चित्रशैलीच्या कार्यशाळा घेतल्या आहेत.

About Belgaum Varta

Check Also

बेळगाव सीसीबीची धडक कारवाई; खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपी गांजासह अटकेत

Spread the love    गोव्यातून गांजा आणून विक्रीचा प्रयत्न; १.७०४ किलो गांजा, मोबाईल जप्त बेळगाव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *