Sunday , July 26 2026
Breaking News

शालेय राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत शिवतेज पाटीलला ब्रांझ पदक

Spread the love

 

निपाणी (वार्ता) : कर्नाटक शालेय राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत येथीलशिवतेज भारत पाटील यांने ब्रांझ पदक पटकावले.
गोडगिरी येथे झालेल्या जिल्हास्तरीय स्पर्धेतून त्याची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली होती. सदरच्या राज्यस्तरीय स्पर्धा मारियामानहळ्ळी (जि. विजयनगर) येथे पार पडल्या.
राज्यातून २३ खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. मॅटवर पार पडलेल्या कुस्तीत ६० किलो वजनी गटात सलग चार बाउट मारून त्याने ब्रांझ पदक पटकावले. आतापर्यंत त्याने राज्यस्तरीय दोन ब्रांझ दोन सिल्वर पदक मिळवले आहेत.
सध्या के. एल इंग्लिश मीडियम स्कूल येथे दहावी मध्ये शिकत असून उपमहाराष्ट्र केसरी रविंद्र पाटील (बानगे) व तुकाराम चोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करत आहे. त्याला बुडाचे अध्यक्ष लक्ष्मण चिंगळे, डॉ. विनोद कुमार, क्रीडा अधिकारी सुनिल पडलीहाळे संगमेश शिवन्नावार, केएई संस्थेचे अध्यक्ष प्रभाकर कोरे, संचालक अमर बागेवाडी, प्राचार्या कांचन धुमाळ, क्रीडा शिक्षक बसवराज कुंभार, मंजुळा बानी, प्रा. डॉ. भारत पाटील यांचे प्रोत्साहन लाभले.

About Belgaum Varta

Check Also

मानकापूर शाळेच्या छतांची दुरुस्ती न केल्याने विद्यार्थी शिक्षकांची गैरसोय

Spread the love  तहसीलदारांच्या आदेशाला केराची टोपली निपाणी (वार्ता) : अडीच महिन्यापूर्वी बोरगाव, मानकापूर परिसरात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *