
निपाणी (वार्ता) : शहर आणि परिसराला सातत्याने २८ वर्षे विचारांची मेजवानी देणाऱ्या डॉ. डॉक्टर आंबेडकर विचार मंचने फुले, शाहू, आंबेडकर विचार संमेलन घेऊन बहुजन आणि मागास समाजाला मार्गदर्शनाचे काम करत आहे. यावर्षीही फुले शाहू आंबेडकर विचार संमेलन घेण्याचा संघटनेच्या बैठकीत निर्धार करण्यात आला.
संघटनेच्या कार्यकर्त्यांनी हे संमेलन दिशादर्शक ठरण्यासाठी वेगवेगळ्या सूचना केल्या. राजेंद्र वंटे यांनी स्वागत केले. प्रा. सुरेश कांबळे यांनी २९ व्या संमेलनाच्या माध्यमातून निपाणी शहर व परिसराला परिवर्तनवादी व समतावादी विचारांचा वैचारिक वारसा डॉ. आंबेडकर विचार मंचने यापुढेही कायम जपण्याचे आवाहन केले. संमेलनाला महाराष्ट्रातील प्रसिद्ध व वैचारिक व्याख्याते आणण्याचा निर्धार झाला.
यावेळी रतन पोळ, लोकेश घस्ते, रमेश कांबळे, दीपक शेवाळे, संदीप माने, विवेक कांबळे, अविनाश माने, साजन घस्ते, यांनी मनोगत व्यक्त केले.
बैठकीस अशोक लाखे, किसन दावणे, गणू गोसावी, सर्जेराव हेगडे, बबन भोसले, अजिंक्य कांबळे, कुमार मेस्त्री, जितेंद्र कांबळे, अविनाश कांबळे, विवेक कांबळे, कैलास ढाले, ऋतिक कांबळे, प्रवीण वंटे, संतोष कांबळे, शक्ती कांबळे, ओंकार कांबळे, चंद्रशेखर इंगळे, भिकाजी कांबळे, महेश चव्हाण, श्रेणिक माने, महेश कांबळे, अमित कांबळे, विश्वनाथ कांबळे, अरुण कांबळे, संकेत कांबळे उपस्थित होते.

Belgaum Varta Belgaum Varta