
श्री मराठा बँकेतर्फे आयोजन;अमाते गल्लीतील ‘तोरणा’ द्वितीय
निपाणी (वार्ता) : येथील मध्यवर्ती छत्रपती शिवाजी महाराज चौकातील श्री मराठा सौहार्द संस्थेतर्फे श्री मराठा किल्ला स्पर्धा २०२५ घेण्यात आल्या. त्याला शहर आणि उपनगरातील मंडळांनी उस्फूर्त प्रतिसाद दिला.या स्पर्धेत साखरवाडी युवक मंडळाचा ‘राजगड’किल्ला अव्वल ठरला. या मंडळाला प्रथम क्रमांकाचे रोख बक्षीस आणि दुर्गराज किताब मान्यवरांच्या हस्ते देण्यात आला.
स्पर्धेत अमाते गल्लीतील टपाल कार्यालया जवळील व्हीटीएम बॉईजच्या तोरणा किल्ल्याने द्वितीय क्रमांकाचे बक्षीस मिळवले. दलाल पेठेतील ट्रबलर्स ग्रुपच्या किल्ल्याने तृतीय क्रमांकाचे बक्षीस पटकाविले.याशिवाय ५ उत्तेजनार्थ बक्षिसे आणि सहभागी मंडळांना सन्मानचिन्ह देण्यात आले. माजी नगराध्यक्ष राजेंद्र उर्फ पप्पू चव्हाण व सुजय पाटील यांच्या हस्ते शिव पुतळ्याचे पूजन झाले. संस्थेचे उपाध्यक्ष ज्ञानेश्वर ढेरे यांनी केले. यावेळी तुर्की येथे झालेल्या आशियाई कझाककुरेश स्पर्धेत कांस्यपदक मिळविल्याबद्दल ईशा भारत पाटील हिचा अजित पाटील, संचालक बाबासाहेब तिप्पे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
कर्नाटक राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत दोन रौप्य व दोन कांस्यपदक मिळवल्याबद्दल शिवतेज भारत पाटील याचा सत्कार शिवाजी पाटील व संदीप खाडे यांच्या हस्ते करण्यात आला.
प्रा. डॉ. भारत पाटील व दीपक वळीवडे यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष प्रशांत नाईक, माजी सभापती किरण कोकरे, सुरेश कांबळे, संचालक अतुल चावरेकर, प्रसन्न दोशी, अभिजित पाटील, युवा उद्योजक विनोद साळुंखे, रणजित सूर्यवंशी, मोहन पाटील, शशिकांत चडचाळे, अन्वर हुक्केरी, इरफान महात, संदीप येरुडकर, नवनाथ चव्हाण यांच्यासह नागरिक उपस्थित होते. अविनाश पाटील यांनी सूत्रसंचालन तर व्यवस्थापक सचिन दुर्गे यांनी आभार मानले.

Belgaum Varta Belgaum Varta