
पाणी योजनेसह १० तास विजेची मागणी; तीन सरकारने केले केवळ कामांचे उद्घाटनच
निपाणी(वार्ता) : करगाव शेती पाणी पुरवठा योजना व हनुमान पाणी पुरवठा या दोन्ही पाणी पुरवठा योजना अनेक वर्षापासून रखडल्या आहेत. त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडले आहेत. या योजना सुरू होईपर्यंत कर्नाटक राज्य रयत संघटनेने चिक्कोडी येथील बसवेश्वर चौकात रयत संघटनेचे कार्याध्यक्ष राजू पोवार, अध्यक्ष चुनाप्पा पुजारी यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन छेडले. त्याची दखल घेऊन तहसीलदार, प्रांताधिकारी पाटबंधारे खात्याचे अभियंते, हेस्कॉम अभियंत्यांनी घटनास्थळी भेट देऊन लेखी आश्वासन दिल्याने हे आंदोलन मागे घेण्यात आले.
बऱ्याच वर्षापासून रखडलेल्या चिक्कोडी जिल्ह्याची असलेली मागणी पूर्ण झाली पाहिजे. शेतकऱ्यांना सध्या सात तास थ्री फेस पुरवठा होत आहे. त्यात आणखी तीन तास वाढवून ती दहा तास करावी.
आतापर्यंत तीन सरकारमधील मंत्र्यांनी करगाव आणि हनुमान पाणी योजनांचे उद्घाटन केले. त्याची पूर्तता झालेली नाही. प्रत्येक वेळी केवळ उद्घाटन केली जात आहेत. पण पाण्याअभावी पिकांचे भवितव्य अंधकारण देण्यात आली आहे. त्यामुळे दोन्ही पाणीपुरवठा योजना पूर्ण करून शेतीला पाणीपुरवठा करण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
यावेळी प्रेमानंद स्वामी, शशिकांत पडसलगी, बाळासाहेब ऐवाळे, दयानंद पाटील, सर्जेराव हेगडे, सागर पाटील, आनंदा गायकवाड, मयूर पोवार, बाळासाहेब पाटील, सिद्धाप्पा मिरजे, कलगोंडा कोटगे, विशाल पाटील, गोपाळ कोकणूर, मल्लाप्पा अंगडी, श्रीशैल अंगडी, मनोज मनगोळी, सुनील पाटील यांच्यासह रयत संघटनेचे पदाधिकारी, शेतकरी व कार्यकर्ते उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta