
निपाणी (वार्ता) : शेतकऱ्यांच्या विविध प्रश्न संदर्भात कर्नाटक राज्य रयत संघटनेचे कार्याध्यक्ष राजू पोवार अनेक वर्षापासून रस्त्यावरची लढाई लढून शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला आहे. अजूनही अनेक समस्या तशाच असून त्यांच्या सोडवणुकीसाठी विधानसौधला रयत संघटनेच्या कार्यकर्त्यांसह शेतकरी गुरुवारी (ता.११) घालणार आहेत. त्यामध्ये चांद शिरदवाड परिसरातील संघटनेचे कार्यकर्ते व शेतकरी सहभागी होण्याचा संकल्प केला आहे.
चांद शिरदवाड येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात रयत संघटनेच्या शाखेतर्फे आयोजित बैठकीत हा निर्धार करण्यात आला.
यावेळी कर्नाटक राज्य रयत संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष राजू पोवार यांनी यंदाच्या हंगामातील उसाला ३४०० रुपये प्रति टन दर मिळवून दिल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. गुरुवारी (ता.११) होणाऱ्या हिवाळी आधिवेशनासाठी परिसरातील शेतकऱ्यांनी बहुसंख्येने सहभागी होण्याचे आवाहन जागृती बैठकीत करण्यात आले. यावेळी शेतकऱ्यांच्या विद्युत पंपांना ७ ऐवजी १० तास थ्री फेज वीज पुरवठा करण्यासह नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई देण्याची मागणी करण्यात येणार असल्याचे बैठकीत सांगण्यात आले.
यावेळी सुभाष पाटील, सुनील पाटील, बबन जामदार, अण्णा पाटील (पोलीस पाटील), शितल पाटील, कल्लू खोत, सतीश पाटील, शांतीनथ डुंनुग, सुरेश चौगुले, जमीर चाऊस, अशोक हिरुकुडे. श्रेणिक नोरजे यांच्यासह कर्नाटक राज्य रयत संघटनेचे विविध शाखांचे पदाधिकारी कार्यकर्ते शेतकरी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta