
निपाणी (वार्ता) : येथील धर्मवीर संभाजी चौकातील शहर रिक्षा असोसिएशनचे माजी सेक्रेटरी संदिप सावंत यांचे चिरंजीव
शिवराज सावंत याची भारतीय सैन्य दलात निवड झाली आहे. शिवाय त्याने वडिलांचे स्वप्न साकार केल्याबद्दल रिक्षा संघटनेतर्फे मध्यवर्ती शिवाजी तरुण मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब जासूद यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
बाळासाहेब जासूद यांनी, शिवराज सावंत याचे वडील संदिप सावंत हे रिक्षा चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. मुलगा देशसेवेत जावा, ही त्यांची मनापासूनची इच्छा होती. संदिप सावंत यांनी कठोर परिश्रम करत शिवराजला सैन्यात भरतीसाठी प्रोत्साहन दिले. शिवराज यानेही परिश्रम, शिस्त आणि जिद्दीच्या बळावर सैनिकी भरतीची तयारी केली.अखेर निवड होऊन आपल्या गावाचे नांव उज्ज्वल केल्याचे सांगितले.
यावेळी सुंदर खराडे, संजय तिप्पे, प्रविण पोवार, दयानंद भोपळे, रवींद्र कमते, रवींद्र हासुरे, रामचंद्र खडके, शग्गीर मोमीन, इम्रान उस्ताद, युवराज प्रताप, विनायक माने, महाविर त्रीकन्नावर यांच्यासह रिक्षा असोसिएशनचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta