
निपाणी (वार्ता) : बोरगाव येथील सहकाररत्न उत्तम पाटील आणि अरिहंत उद्योग समूहाचे अध्यक्ष युवा उद्योजक अभिनंदन पाटील यांनी मुंबई येथे माजी केंद्रीय मंत्री व राज्यसभा खासदार शरद पवार यांची भेट घेतली. नवी मुंबईतील पवार यांच्या ‘सिल्वर ओक’ या निवासस्थानी ही बैठक झाली. यावेळी निपाणी तालुक्यातील राजकीय परिस्थितीवर चर्चा करण्यात आली. लोकसभा निवडणुकीत उत्तम पाटील यांनी विनाअट काँग्रेसला पाठिंबा दिला होता. काँग्रेस उमेदवारासाठी पवार यांनी निपाणी सभा घेतली होती. तसेच राष्ट्रीय पातळीवर राष्ट्रवादी आणि काँग्रेस हेमित्रपक्ष असूनही काँग्रेसकडून उत्तम पाटील यांच्या बाबतीत असहकार्याची भूमिका घेतली जात नसल्याचे दिसून आले आहे. त्या पार्श्वभूमीवर ही भेट चर्चेचा विषय ठरली आहे. या भेटी दरम्यान संघटनात्मक बाबींवर सखोल व सकारात्मक चर्चा झाली.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भातही चर्चा झाली. पवार यांच्या सूचनेमुळे मांगुर फाटा येथे पिलर पुलाला मंजुरी मिळून काम सुरू झाले आहे. यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान टळले. याबद्दल पवार यांचे आभार मानण्यात आले. यावेळी जितेंद्र पाटील, वर्धमान पाटील -जयसिंगपूर, पुण्याचे उद्योगपती दीपक थोरात उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta