
निपाणी (वार्ता) : निपाणी तालुक्यातील सकल मराठा समाजातर्फे शनिवारी (ता.२७) सायंकाळी ४ वाजता मराठा मंडळ सांस्कृतिक भवनात मराठा समाजाच्या व्यापक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यास मार्गदर्शन करण्यासाठी कर्नाटकाचे कामगार मंत्री संतोष लाड व माजी मंत्री श्रीमंत पाटील उपस्थित राहणार आहेत. तालुक्यातील मराठा समाजबांधवांनी मेळाव्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन समाजातर्फे करण्यात आले आहे.
अनेक वर्षांपासून मराठा समाजाची सामाजिक, आर्थिक, शैक्षणिकदृष्ट्या पीछेहाट झाली आहे. समाजाच्या प्रगती बाबत या मेळाव्यात मार्गदर्शन होणार आहे. समाजातील युवकांना शिक्षणानंतर उद्योग, व्यवसाय व नोकरीसाठी मार्गदर्शन करण्याठी राजकारण विरहित या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
त्यामुळे तालुक्यातील मराठा समाज बांधवांनी पक्षभेद विसरुन एकजूट दाखवण्यासाठी मोठ्या संख्येने सर्वांनी या मेळाव्याला उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta