
निपाणी (वार्ता) : अनेक वर्षे मागणी असलेल्या निपाणी-लखनापूर रोडवरील केसरकर- वालीकर मळ्याजवळील ओढ्यावर पूल
बांधण्याची सार्वजनिक बांधकाम खात्याकडून मंत्री सतीश जारहोळी यांनी २.७५ कोटी रुपयाचा निधी मंजूर झाला होता. या कामाचा प्रारंभ खासदार प्रियंका जारकीहोळी यांच्या हस्ते करण्यात आला.
माजी नगरसेविका अनिता पठाडे चिकोडी जिल्हा काँग्रेस अध्यक्ष लक्ष्मण चिंगळे, उपाध्यक्ष रोहन साळवे, सहकाररत्न उत्तम पाटील राजेंद्र वडर यांच्या हस्ते भूमिपूजन झाले. प्रज्वल मारीहाळे यांनी स्वागत केले.
खासदार जारकीहोळी म्हणाल्या, शेतकरी आणि नागरिकांच्या समस्या लक्षात घेऊन पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी हा निधी मंजूर केला आहे. त्यामधून दर्जेदार काम करून या भागातील नागरिकांची सोय करणार असल्याचे सांगितले.
दिलीप पठाडे यांनी, दरवर्षी होणाऱ्या पावसामुळे ओढ्याला भराव आणि पूल वाहून जात होता. आता निधी मंजूर करून कामाला प्रारंभ झाल्याने कायमस्वरूपी समस्या निकालात निघणार असल्याचे सांगितले.
यावेळी केपीसीसी सदस्या सुप्रिया पाटील, सहकाररत्न उत्तम पाटील पंकज पाटील, राजेश कदम, रोहन साळवे, निकु पाटील, सुमित्रा उगळे, राजेंद्र वडर, प्रतीक शहा, मारुती केसरकर, प्रभाकर केसरकर, बाळासाहेब वालीकर, प्रवीण पाटील, कुमार वालीकर, सोमनाथ पाटील, विशाल नाईक यांच्यासह केसरकर वालीकर मळ्यातील नागरिक व शेतकरी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta