निपाणी (वार्ता) : गळतगा (ता. निपाणी) येथील ग्रामदैवत श्री रेणुकादेवी व श्री सरसव्वादेवी गादी यल्लम्मा यात्रेनिमित्त गळतगा व्हॉलीबॉल संघ व ग्रामस्थांच्यावतीने भव्य शुटिंग व्हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचे उदघाटन मंगळवारी (ता.१३) मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. बोरगाव येथील माजी जिल्हा पंचायत सदस्य व चिक्कोडी जिल्हा काँग्रेस समीतीचे उपाध्यक्ष आण्णासाहेब हावले, कोगनोळी येथील माजी जिल्हा पंचायत सदस्य पंकज पाटील, भोज जिल्हा पंचायतीचे माजी सदस्य राजेंद्र वड्डर-पवार, गळतगा ग्राम पंचायत अध्यक्ष अलगोंडा पाटील व महावीर निटवे-चौगुले यांच्या हस्ते या स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर आण्णासाहेब हावले, राजेंद्र वड्डर-पवार, पंकज पाटील यांनी खेळाडूंचे स्वागत करुन त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी गळतगा व्हॉलीबॉल संघटनेकडून मान्यवरांचा सत्त्कार करण्यात आला.
राजेंद्र वडा यांनी, अलीकडच्या काळात युवक मोबाईल, टीव्ही मध्ये गुंतला असून मैदानी खेळाकडे त्यांचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे युवकांनी मैदानी खेळ करून आरोग्य संपत्ती कमविल्यास विविध क्षेत्रात भविष्यात करिअर होऊ शकते. त्यामुळे युवकांनी मैदानी खेळाकडे वळण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमास आनंद गिंडे, मल्लु रुगे, महावीर चौगुले, ग्राम पंचायत सदस्य राहुल वाकपट्टे, वर्धमान रुगे, धिरज वड्डर, वसंत धारव, डॉ. महावीर चेंडके, बाबु खोत, शितल बेडकिहाळे, अल्ताफ मुल्ला, मिलिंद कोंडेकर, कुमार मरबिल्ले, ॲड. राजु शिंदे, अशोक उगारे यांच्यासह गळतगा व्हॉलीबॉल संघाचे सदस्य, ग्राम पंचायत सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्पर्धेत निपाणी, चिक्कोडी तालुक्यासह, बेळगांव, चलकरंजी, कुरुंदवाड, सांगली, जयसिंगपूर, कागल व कोल्हापूर येथील नामवंत संघानी सहभाग घेतला आहे. स्पर्धा सुरळीत पार पाडण्यासाठी संयोजन कमिटीतर्फे विशेष प्रयत्न घेतले जात आहेत.
Belgaum Varta Belgaum Varta