Friday , April 17 2026
Breaking News

मरगाळे व गीरी बेमुदत उपोषण : रोडचा फेर सर्वे करण्याचे आदेश

Spread the love

 

खानापूर : आज दुपारी कॉंग्रेसचे ब्लॉक अध्यक्ष ॲड. घाडी साहेबांनी तहसिलदार व एडीएलआर यांना खानापूर शहरातील रोडचा फेर सर्वे करण्याचे निवेदन दिले आणि संध्याकाळी लगेच तहसिलदार यांनी मोजणीचे आदेश दिले व एडीएलआर यांनी उद्या सकाळी ९.३० वाजता खानापूर शिवस्मारक चौक ते जांबोटी सर्कल पर्यंतचा सर्वे करण्यासाठी नोटीस काढल्या.
शेवटी हा रोडचा म्हणजे लोकांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे, सार्वजनिक विषय आहे, त्यामुळे माजी आमदार डॉ अंजलीताई हेमंत निंबाळकर यांनी ताबडतोब सरकारी यंत्रणा हालवून सर्वे ताबडतोब करण्यास सांगितले.
उद्या सर्वे होईल ….
पुढच्या २५ वर्षांचा विचार करून रस्ते झाले पाहिजेच ही ताईंची दुरदृष्टी आहे, अंजलीताई निंबाळकर आमदार असताना नितीन गडकरी साहेबांना भेटल्या होत्या त्यावेळी डांबरी रोड ऐवजी सीसी रोड करून द्या ही मागणी लावून धरली होती ही ताईंची दुरदृष्टी होती.
पुढे रोड मंजूर झाला १४ कोटी रूपये मंजूर झाले. परंतु रोडचे काम करत असताना काही लोकांचे म्हणणे होते नकाशा प्रमाणे रोड चे काम करा रोडवर अतिक्रमण झाले आहे ते काढून रोड करा या मागणीसाठी माजी नगरसेवक उपोषणांस बसले आहेत, या उपोषणांस ताईंनी पाठींबा दिला, ब्लॉक कॉंग्रेसचे नेते पण सामिल झाले.

उद्या सकाळी ९.३० वाजता सर्वेचे काम चालू होणार आहे तमाम खानापूर शहरातील व पंचक्रोशीतील सर्वांनी हजर रहावयाचे आहे.

सर्वेसाठी तहसिलदार खानापूर, सर्वे डिपार्टमेंट, सीओ पट्टन पंचायत, पोलीस प्रशासन, आरआय तलाठी, वगैरे सर्वजण उपस्थित रहाणार आहेत.

About Belgaum Varta

Check Also

हलशी – हलशीवाडी लक्ष्मीयात्रेचे औचित्य साधून ग्रामस्थांच्या वतीने प्रकाश मरगाळे आणि अंकुश केसरकर यांचा सत्कार

Spread the love  खानापूर : हलशी – हलशीवाडी लक्ष्मीयात्रेचे औचित्य साधून ग्रामस्थांच्या वतीने महराष्ट्र एकीकरण …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *