Thursday , March 5 2026
Breaking News

पालिकेचे महसूल अधिकारी सुनील कांबळे यांना मातृशोक

Spread the love

 

निपाणी (वार्ता) : निपाणी येथील नगरपालिकेचे महसूल अधिकारी सुनील कांबळे यांच्या मातोश्री आणि थळोबा पेठेमधील प्रतिष्ठित महिला राधाबाई कृष्णा कांबळे (वय ९२) यांचे बुधवारी (ता.४) निधन झाले. त्या अत्यंत मनमिळावू स्वभावाच्या होत्या. परोपकारी वृत्तीमुळे त्या सर्वांना परिचित होत्या. अत्यंत कठीण परिस्थितीत त्यांनी कुटुंबाचा सांभाळ केला. त्यांच्या निधनामुळे निपाणी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या मागे मुलगा, सून, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन शुक्रवारी (ता.६) सकाळी नऊ वाजता आहे.

About Belgaum Varta

Check Also

बोरगावमधील हावले कुटुंबीयांचे आधारवड नरसू हावले यांचे निधन

Spread the love  निपाणी (वार्ता) : बोरगाव येथील प्रतिष्ठित नागरिक, श्री. सिद्धेश्वर क्रेडिट संस्थेचे संस्थापक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *