श्रीमंत विजयराजे निपाणकर; एच. ए. मोतीवाला यांची ७६ वी जयंती
निपाणी (वार्ता) : व्यवसायातून प्रगती साधणारे अनेक असतात. मात्र सेवाव्रत स्वीकारून समाजातील रंजल्या, गांजल्यांना मानसिक आणि आर्थिक स्वरूपात मायेचा आधार देणारे रत्नशास्त्री दिवंगत एच. ए. मोतीवाला होते. त्यांनी सर्वधर्मातील नागरिकांना, संघ, संस्था, संघटनांना सामाजिक उपक्रमांसाठी तसेच वैयक्तिक गरजूंनाही मदतीचा सढळ हाताने लाभ दिला. त्यांची माणुसकीच्या रूपातील समाजसेवा सर्वांसाठी समाजासाठी प्रेरणादायी आहे, असे मत श्रीमंत विजयराजे निपाणकर- सरकार यांनी केले.
निपाणीतील नामवंत रत्नशास्त्री दिवंगत एच. ए. मोतीवाला यांची ७६ वी जयंती शुभ नरवीर तानाजी चौकातील शुभरत्न केंद्रामध्ये साजरी करण्यात आली. त्याप्रसंगी विजय राजे सरकार बोलत होते.
प्रारंभी विजयराजे निपाणकर यांच्या हस्ते दिवंगत एच. ए. मोतीवाला यांच्या पुतळ्यासह प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.
रत्नशास्त्री ए. एच. मोतीवाला म्हणाले, वडील दिवंगत एच. ए. मोतीवाला यांनी आजारपण, गरजू विद्यार्थ्यांचे शिक्षण, मठ, मशिदी, मंदिरांसाठी निधी, अन्नदान, दिव्यांगाना अर्थसहाय्य अशा अनेक माध्यमातून समाजसेवा केली आहे. त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून मोतीवाला फाउंडेशनच्या माध्यमातून समाजकार्य काम सुरू असल्याचे सांगितले.
कार्यक्रमास करण माने, सुनील शेलार, दीपक घोडके, पांडुरंग भोई, प्रवीण सुतार, योगेश जाधव, अक्षय जाधव, अनिकेत पावले, भूषण खैरे, नरेश शेलार, इरफान पकाली, रणजित पोटी, महेश गाडीवडर, प्रकाश माने, वैभव बोडके, ऋषिकेश सूर्यवंशी, प्रणव पावले, बाळू राऊत, राहुल नांदगावकर, ओंकार सुगते, अभिजीत काटे यांच्यासह संयुक्त छत्रपती तालीम महिला मंडळ, न्यू लायन्स मित्र मंडळाचे कार्यकर्ते नागरिक उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta