Monday , March 9 2026
Breaking News

अकोळ विविधोद्देश प्राथमिक ग्रामीण कृषी संघाच्या नूतन इमारतीचा उद्या उद्घाटन सोहळा

Spread the love

 

निपाणी (वार्ता) : संघाचे सभासद, ग्राहक ठेवीदार, पदाधिकारी हितचिंतकांच्या सहकार्याने अकोळ विविधोद्देश प्राथमिक ग्रामीण कृषी संघाची नवीन इमारत बांधली आहे. त्याचा उद्घाटन समारंभ आणि शताब्दी पुर्ती महोत्सव सोहळा सोमवारी (ता.९) सकाळी १०.१५ वाजता आयोजित होणार आहे.
सोहळ्याचे उद्घाटन माजी खासदार, जिल्हा बँकेचे अध्यक्ष अण्णासाहेब जोल्ले यांच्या अध्यक्षतेखाली संस्थेचे जेष्ठ मार्गदर्शक मलगोंडा पाटील (बाबा पाटील) यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. कार्यक्रमात प्राथमिक ग्रामीण कृषी सहकारी संघासाठी भरीव कार्य केल्याबद्दल ज्येष्ठ मार्गदर्शक मलगोंडा पाटील (बाबा) यांचा संघातर्फे मानपत्र देऊन विशेष सत्कार करण्यात येणार आहे.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार गणेश हुक्केरी, बेळगाव येथील माजी विधान परिषद सदस्य महांतेश कवटगीमठ, माजी खासदार रमेश कत्ती, माजी मंत्री वीरकुमार पाटील, सहकाररत्न उत्तम पाटील, अरिहंत उद्योग समूहाचे कार्याध्यक्ष अभिनंदन उर्फ बच्चू पाटील, बुडा अध्यक्ष लक्ष्मण चिंगळे, अक्कोळ येथील माजी जिल्हा पंचायत सदस्य चेतन स्वामी, गाव कामगार पाटील राजू पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तरी नूतन इमारत उद्घाटन समारंभ आणि संघाच्या शतकपूर्ती महोत्सव सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आवाहन संघाचे अध्यक्ष पद्मराज पाटील, उपाध्यक्ष निर्मला भुई, संचालक युवराज पाटील, विवेकानंद सोळांकुरे, शर्मिला कागे, विमलनाथ पाटील, रावसाहेब मुधाळे, महेश मलाबदे, श्रीकांत बन्ने, अनिल कोळी, भूपाल म्हेत्री,
यांच्यासह संचालक मंडळांनी केले आहे.

About Belgaum Varta

Check Also

बेनाडीत रेसिंग असोसिएशनतर्फे ११ रोजी १४ लाख बक्षिसांच्या बैलगाडी शर्यतींचा थरार

Spread the love  निपाणी (वार्ता) : बेनाडी येथील रेसिंग असोसिएशन कमिटीच्या सहकार्याने हालसिद्धनाथ सहकारी साखर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *