Saturday , March 14 2026
Breaking News

निपाणी मतदारसंघ राज्यात विकासाचे मॉडेल बनवू : खासदार प्रियांका जारकीहोळी

Spread the love

 

बेडकीहाळ येथे विकास कामाचा प्रारंभ

निपाणी (वार्ता) : दहा वर्षापासून निपाणी मतदारसंघातील विकास कामांना म्हणावे तशी चालना मिळालेली नाही. रस्ते, पाणी, आरोग्य अशा अनेक समस्यांना नागरिकांना तोंड द्यावे लागत आहे. नागरिकांच्या समस्या ऐकून घेऊन आता निपाणी मतदारसंघाचे विकास कामाच्या माध्यमातून नंदनवन करण्यासाठी प्रयत्नशील आहे. कर्नाटक राज्यात निपाणी मतदारसंघ विकासाच्या बाबतीत मॉडेल बनवू, असे मत खासदार प्रियांका जारकीहोळी यांनी व्यक्त केले. बेडकिहाळ येथील एससी एस.टी. समाजामध्ये २५ लाख रुपयांच्या निधीतून रस्ता निर्मितीच्या कामाचा प्रारंभ करून त्या बोलत होत्या.
खासदार जारकीहोळी म्हणाल्या, गावातील नागरिकांना पायाभूत सुविधा मिळाव्यात, यासाठी हे काम हाती घेण्यात आले आहे‌. या कामामुळे परिसरातील रस्ते व्यवस्था सुधारून स्वच्छता आणि वाहतुकीची सोय अधिक सुलभ होणार आहे. ग्रामीण भागाचा विकास हा आपल्या कामाचा केंद्रबिंदू असून बेडकिहाळसह संपूर्ण परिसरात विविध विकासकामे राबवली जात आहेत. पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्या नेतृत्वाखाली मतदारसंघाचा सर्वांगीण विकास साधण्याचा संकल्प करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
प्रारंभी खासदार जारकिहोळी व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते कामाचा प्रारंभ करण्यात आला. त्यानंतर बुडा अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे यांनी राज्य शासनाच्या विकास कामांचा आढावा घेतला.
कार्यक्रमास चिककोडी जिल्हा काँग्रेस अध्यक्ष, बुडा अध्यक्ष लक्ष्मणरा चिंगळे, केपीसीसी महिला सदस्या सुप्रिया पाटील दत्तकुमार पाटील, माजी जिल्हा पंचायत सदस्य पंकज पाटील, निपाणी ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष राजेश कदम, बेडकीहाळ भाग काँग्रेस अध्यक्ष बसवराज पाटील, अशोक आरगे, शिवानंद बिजले, जीवन यादव, प्रमोद पाटील, अजय पाटील, ताजुद्दीन मुल्ला, चांद मुल्ला, धनंजय मोरे, नामदेव पाटील, दिनकर सनदी, धनपाल देसाई, वसंत देसाई, मारुती पुजारी, संजय देसाई, अनिल सूर्यवंशी, अनिल गोसावी, सुवर्णा बत्ते, जयश्री जाधव, स्वाती कांबळे, वनिता देसाई, दीपा जाधव यांच्यासह कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

गावांच्या वेशीवर कचऱ्याने होतेय स्वागत

Spread the love  निपाणी ग्रामीण भागातील चित्र; कचरा व्यवस्थापनाचा प्रश्न गंभीर निपाणी (वार्ता) : प्रत्येक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *