निपाणी (वार्ता) : कारदगा येथील पीर बंगाली ऊरुसातील शर्यतीत अजित गावडे यांच्या बैलगाडीने प्रथम क्रमांक पटकावून १५ हजार एक रुपयाचे बक्षीस व निशान मिळवले. येथील रेंदाळ रस्त्यावर या शर्यती घेण्यात आल्या. यात्रा कमिटी पदाधिकारी व मान्यवरांच्या हस्ते या शर्यतीचे उद्घाटन करण्यात आले.
जनरल बैलगाडी शर्यतीमध्ये राहुल यादव- विकास कोरे यांच्या गाड्यांनी अनुक्रमे द्वितीय आणि तृतीय क्रमांकाची १० हजार एक रुपये आणि ७ हजार एक रुपयांची बक्षिसे मिळवली. घोडा गाडी शर्यतीमध्ये नितीन हुक्केरी, शरद खुबन्नावर आणि बानु नैना प्रेमी घोडा गाड्यांनी अनुक्रमे प्रथम ते तृतीय क्रमांकाची ९ हजार एक रुपये, ७ हजार एक रुपये आणि ५ हजार एक रुपयांची बक्षीसे मिळविली. घोडा- बैलगाडी शर्यतीमध्ये बंडू जाधव, सागर आवन्नावर आणि ऋषिकेश आरगे यांच्या गाड्यांनी अनुक्रमे प्रथम ते तृतीय क्रमांकाची ९ हजार एक रुपये, ७ हजार एक रुपये आणि ५ हजार एक रुपयांची बक्षीसे पटकवली. घोडेस्वार शर्यतीमध्ये शरद खूबणावर, रेंदाळ मेजर आणि गणेश चव्हाण यांनी प्रथमच तृतीय क्रमांकाची ३ हजार ५००,२ हजार ५०० आणि १ हजार ५०० रुपयांची बक्षिसे मिळवली. सर्व विजेत्यांना ग्रामपंचायत जवळील पीर बंगाली पुरुष कमिटी कार्यालयासमोर उरुस कमिटी अध्यक्ष अरविंद खराडे व पदाधिकाऱ्यांच्या हस्ते बक्षीस देऊन गौरविण्यात आले. शर्यती पाहण्यासाठी कारदगा आणि परिसरातील शर्यती शौकिनांनी गर्दी केली होती. शर्यती यशस्वी करण्यासाठी उरूस कमिटी, विविध मंडळाचे पदाधिकारी आणि ग्रामस्थांचे सहकार्य लाभले.
Belgaum Varta Belgaum Varta