Sunday , April 5 2026
Breaking News

भीमापूरवाडीत रामनवमीनिमित्त आयोजित विविध कार्यक्रमांना उत्स्फूर्त प्रतिसाद

Spread the love

 

निपाणी (वार्ता) : निपाणी मतदारसंघातील भिमापुरवाडी गावातील मर्यादा पुरुषोत्तम श्री राम मंदिरामध्ये जन्मोत्सवानिमित्त करण्यात आले होते. त्याला परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन रामाच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती.
भोज माजी जिल्हा पंचायत सदस्य व कर्नाटक राज्य ओसीसीआय संचालक राजेंद्र -पवार वडर यांच्या हस्ते श्रीरामाच्या प्रतिमेचे पूजन आणि आरती करण्यात आली.
यावेळी श्रीराम नवमी सोहळा अत्यंत भक्तिमय व उत्साह पूर्ण वातावरणात झाला. या पावन प्रसंगी उपस्थित राहून मनोभावे दर्शन घेण्याचे सौभाग्य भाविकांना लाभले. यावेळी गळतगा येथील दिवंगत रामाप्पा पवार- वडर यांच्या स्मरणार्थ राजेंद्र पवार -वडर यांच्याकडून मंदिरात पाण्याची टाकी बसवून भाविकांसाठी पाण्याची व्यवस्था करण्यात आली. या सुविधाचे लोकार्पण राजेंद्र वडर आणि सुखदेव साळुंखे यांच्या हस्ते करण्यात आले. राम नवमीनिमित्त आयोजित केलेल्या हॉलीबॉल स्पर्धेचे उद्घाटनही वडर यांच्या हस्ते झाले.
यावेळी अलगोंडा पाटील, बाळासाहेब साळुंखे, महावीर घोसरवाडे, राजेंद्र कोंडेकर, सुखदेव साळुंखे, धीरज साळुंखे, उदय बेलेकर, उदय कोंडेकर शामा कोंडेकर, संदीप कोंडेकर, पोपट साळुंखे, बाळू साळुंखे, रवी जगताप, मिलिंद कोंडेकर, अविनाश सुतार, अरुण भिलुगडे, शांतिनाथ भिलुगडे, निळू साळुंखे, यांच्यासह भाविक आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

सिद्धार्थ ढोणे महाराजांच्या भाकणूकीने बेनाडी बिरदेव यात्रेची उत्साहात सांगता

Spread the love  निपाणी (वार्ता) : बेनाडी येथे बिरदेव देवस्थान कमिटीतर्फे आयोजित बिरदेव यात्रेची सांगता …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *