Monday , May 25 2026
Breaking News

बोरगाव येथील मराठा समाज जागेसाठी उत्तम पाटील यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

Spread the love

 

निपाणी (वार्ता) : बोरगाव शहरातील मराठा समाजासाठी जागा उपलब्ध व्हावी, या मागणीसाठी सहकाररत्न उत्तम पाटील यांच्या नेतृत्वाखाली बेळगाव जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांची भेट घेऊन त्यांना निवेदन देण्यात आले. मराठा समाजाला जागा मिळावी, यासाठी नगरपंचायतीच्या मासिक सभेत ठराव करण्यात आला होता. या कार्याला गती मिळून समाजाला तात्काळ जागा मिळून समाजाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना ही निवेदन देण्यात आले.
उत्तम पाटील म्हणाले, मंजूर जागेत छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा, शिवाजी उद्यान, समुदाय भवन, यासह अन्य कामे होणार आहेत. समाजासाठी जागा मंजूर झाल्यास शहराच्या वैभवात आणखी भर पडणार आहे. मराठा समाजाला जागा मिळावी, यासाठी नगरपंचायतीतर्फे सर्वांना विश्वासात घेऊन नगरपंचायतीमध्ये ठराव केला आहे. शासकीय पातळीवर लवकरात लवकर प्रयत्न करून समाजाला जागा मंजूर करण्याची मागणी उत्तम पाटील यांनी जिल्हाधिकारी केली.
जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी निवेदन स्वीकारून शासकीय पातळीवर आपण प्रयत्न करण्याचे सकारात्मक आश्वासन दिले.

यावेळी नगराध्यक्ष दिगंबर कांबळे, उपनगराध्यक्षा भारती वसवाडे, नगरसेविका वर्षा मनगुत्ते, मराठा समाजाचे अध्यक्ष उत्तम कदम, राजू उरणकर, सुवर्णा निकम, तुळशीदास वसवाडे, माजी नगराध्यक्ष संगापा ऐदमाळे याच्यासह मराठा समाजाचे पदाधिकारी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

आप्पाचीवाडी पुलासाठी आरपारची लढाई; रयत संघटनेचे कार्याध्यक्ष राजू पोवार

Spread the love  २८ रोजी पाटबंधारेसह तालुका पंचायत कार्यालयाला टाळे ठोकणार निपाणी (वार्ता) : आप्पाचीवाडी, …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *