Monday , September 21 2026
Breaking News

कुद्रेमानीत ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हनुमान जन्मोत्सव सोहळ्याची मुहूर्तमेढ उत्साहात

Spread the love

 

कुद्रेमानी (प्रतिनिधी) : गावात भक्ती, श्रद्धा आणि अध्यात्माचा संगम घडवणाऱ्या श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी सांप्रदायिक पारायण व अखंड हनुमान जन्मोत्सव सोहळ्याची मुहूर्तमेढ आज रामनवमीच्या मुहुर्तावर कार्यक्रम मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात संपन्न झाला.

या पवित्र सोहळ्याचे अधिष्ठान ह.भ.प. बाबूराव महाराज व ह.भ.प. रामचंद्र रवळू पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली लाभले. त्यांच्या आशीर्वादाने या धार्मिक उपक्रमाची सुरुवात करण्यात आली.

या मंगल प्रसंगी मुहूर्तमेढ करण्याचा मान ह.भ.प. अरुण पुंडलिक देवण व ह.भ.प. तुकाराम पुंडलिक बडसकर यांना लाभला. त्यांच्या शुभहस्ते विधीवत मुहूर्तमेढ पूजन करण्यात आले. यावेळी भजनी मंडळाने साप्रदायिक भजन सादर करून वातावरण भक्तिरसात रंगवले.

कार्यक्रमादरम्यान दोन्ही मान्यवरांनी या पवित्र कार्यासाठी आर्थिक मदत देऊन आपला सेवाभाव व्यक्त केला. त्याबद्दल त्यांचा सत्कार वर्शिलदार गावडा धोंडिबा पाटील यांच्या हस्ते ह.भ.प. अरुण देवण यांचा, तसेच वर्शिलदार गुरव शिवाजी महादेव गुरव यांच्या हस्ते ह.भ.प. तुकाराम पुंडलिक बडसकर यांचा टोपी, शाल व श्रीफळ देऊन करण्यात आला.

यावेळी मंडप डेकोरेटर सेवा करणारे यल्लापा नाईक यांनाही पानविडा व श्रीफळ देण्यात आले.

या प्रसंगी दीपक पाटील, सुरेश पाटील, नाना मारुती पाटील, बाळाराम कदम, संजय राजगोळकर, गावडू संभाजी पाटील, मधु पन्हाळकर, शंकर पाटील, रुक्माणा कागणकर, बबन गुरव, सुरेश केदारी पाटील, प्रकाश यळळूरकर, गोविंद तरवाळ, आप्पाजी नाईक व लक्ष्मण राजगोळकर यांच्यासह गावातील ह.भ.प. सांप्रदायिक भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन रवी पाटील यांनी केले, तर आभार प्रदर्शन परशराम काकतकर यांनी मानले.

या सोहळ्यामुळे कुद्रेमानी परिसरात भक्तीमय वातावरण निर्माण झाले असून आगामी ज्ञानेश्वरी सप्ताह व हनुमान जन्मोत्सवासाठी भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *